अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यात मुड़ी येथे हायस्कूल, मराठी शाळेत व लोण आश्रम शाळेत फुटबॉल स्पर्धेचे उदघाटन करताना
सदर स्पर्धांचे उदघाटन जि.प.. सदस्या सौ संगीता ताई व मुड़ी चे माजी सरपंच व भा.ज .पा तालुका उपाअध्यक्ष श्री. संजय युवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जास्तीत जास्त खेळाडूंनी फुटबॉल या खेळाकडे आकर्षित होवून फुटबॉल कौशल्यासोबतच् तंदुरुस्त व्हावे यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी भारतात यावर्षी १७ वर्षा आतील फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या पाश्वभूमीवर संपूर्ण देशामध्ये फुटबॉलचा प्रचार व प्रसार विशेष कार्यक्रम जाहीर केले आहे.
या निमित्ताने शाळेत सर्व विद्यार्थ्यांना मिशन फुटबॉल स्पर्धेची नियम अटी सांगितले व मुला मुलींची संघ खेळविण्यात आले.
लोण शाळेत चित्रकला,तसेच निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.
यावेळी लोण चारम सरपंच महेश बापू , लोण खू. सरपंच श्री. कैलास आप्पा, एकतास सरपंच श्री. साहेबराव पाटील व युवा मोर्चा चे विवेक पाटील इतर शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी_शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी, तसेच पंच उपस्थित होते.