अमळनेर (प्रतिनिधी )मारवड ता. अमळनेर येथील ग्रामविस्तार अधिकारी एस. आर. पारधी यास घरकुल प्रकरणात पाच हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जळगावच्या एसीबीच्या पथकाने आज दुपारी छापा रचून ताब्यात घेतले. याप्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात चौकशी सुरु असून त्यांचे भ्रमणध्वनीवरील संभाषणाची परताळणी सुरु आहे. तक्रारदाराने ग्रामविस्तार अधिकारी पारधी यांच्याविरोधात गेल्या दोन महिन्यांपूर्वी तक्रार दिली होती. याप्रकरणात 'एसबी'च्या पथकाने यापूर्वी चारवेळा छापा रचुन त्यास पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न अशस्वी ठरत होते. अखेर आज पथकाला पारधी यास जाळ्यात ओढण्यात यश आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात संदर्भात प्रक्रिया सुरु आहे.
--------------