लोक न्यूज
युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह जी यांच्या स्मृतीत साजरा होणारा हा वर्षभर चालणाऱ्या सेवा उपक्रमांचा प्रारंभबिंदू आहे. याअंतर्गत देशभरात सुमारे ७०५ ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जाणार असून, करुणा आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प यामागे आहे.
विशेष म्हणजे, रक्तदानाची ही पावन परंपरा मागील चार दशकांपासून अखंडपणे सुरू आहे. आतापर्यंत ९,१७४ रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून सुमारे १५,००,२३० युनिट रक्त संकलित करण्यात आले असून, मानवसेवेप्रती निरंकारी मिशनची अटळ बांधिलकी यामुळे अधोरेखित होते.
याचाच भाग म्हणून अमळनेर या ठिकाणी 14 जून रविवार रोजी होणाऱ्या रक्तदान शिबिरासाठी 13 जून शनिवार रोजी संपूर्ण अमळनेर शहरात मोटरसायकल रॅली च्या माध्यमातून जन जागृती करण्यात आली आणि रविवार रोजी सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत ब्रांच अमळनेर,येथे संत निरंकारी सत्संग भवन सिंधी कॉलनी चोपडा रोड,येथे आयोजित रक्तदान शिबिरात 53 रक्त युनिट संकलन करण्यात आले या ठिकाणी रक्तकेंद्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे येथील अनुभवी डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदात्यांची आवश्यक आरोग्य तपासणी करून सुरक्षित, सुव्यवस्थित आणि प्रभावी पद्धतीने रक्तदान प्रक्रिया पूर्ण केली. संपूर्ण आयोजनात स्वच्छता, सतर्कता आणि सेवाभाव यांना विशेष प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे हा उपक्रम केवळ जीवनदायी सेवापुरता मर्यादित न राहता मानवता, करुणा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे उच्च प्रतीक म्हणून समोर आला.
युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह जी यांनी सत्य, साधेपणा आणि सद्भावनेचा मार्ग दाखवत तरुणांना नशामुक्त जीवनाचा अवलंब करण्याचे आणि आपली ऊर्जा समाजसेवेसाठी वापरण्याचे आवाहन केले. बाबा हरदेव सिंह जी यांनी “रक्त नाड्यांतून वाहावे, नाल्यांतून नव्हे” हा संदेश देत सेवेला जीवनाचा अविभाज्य घटक बनवले. हाच सेवा-संदेश सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आजही प्रभावीपणे पुढे नेला जात आहे.
रक्तदान शिबीराच्या उदघाटन साठी धुळे झोन 36 बी चे झोनल ईंचार्ज आ म श्री हिरालाल पाटील जी यांनी फित कापून केले. यावेळी अमळनेर ब्रँच चे प्रमुख आ श्रीचंद निरंकारी जी उपस्थित होते.
या शिबीरासाठी आलेल्या रक्त दात्यानां अल्पोपहार, चहा, बिस्कीट, फळफळावळ व प्रशस्तीपत्र देण्यात आले.
या शिबिराच्या आयोजन नियोजन साठी अमळनेर ब्रँच सेवादल इंचार्जे जितेंद्र डिंगराई महिला ईंचार्जं बहन प्रीती बटेजा , यांच्या सह अमळनेर सेवादल सदस्य व साध संगत यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेवुन कार्यक्रम यशस्वी केला.