अमळनेर :लोक न्यूज
कनिष्का फाउंडेशन संचालित सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, तांबेपुरा (अमळनेर) येथे जागतिक बालिका दिवस मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. “समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली” या विचारांना अनुसरून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. भारती संजय सोनवणे (राज्य परिषद सदस्य – भाजपा) उपस्थित होत्या. तसेच संस्थेचे चेअरमन श्री. महेश पाटील सर यांचीही कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
यानंतर इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी मानवी पंकज पाटील हिने सावित्रीबाईंच्या भूमिकेत सादरीकरण करत आपले मनोगत व्यक्त केले. तिच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
“सोनपावली येथे जीवनी, हसते खेळते बागडते,
मुलगी असते घरात ज्या, अवघ्या घराचे गोकुळ करते”
या ओळींमधून बालिकेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
३ जानेवारी बालिका दिवसाच्या निमित्ताने लहान मुलींसाठी एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. कार्यक्रमादरम्यान प्रमुख अतिथी सौ. भारती संजय सोनवणे यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले व विजेत्या तसेच सहभागी विद्यार्थिनींना बक्षिसांचे वितरण करून त्यांचे मनोबल वाढवले.
कार्यक्रम पाहण्यासाठी पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नूतन महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनिता पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. भारती पाटील यांनी केले.
बालिकांचे शिक्षण, सक्षमीकरण व आत्मविश्वास वाढवण्याचा संदेश देणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.