लोक न्यूज
अमळनेर:-खान्देश शिक्षण मंडळातील सभासदांचा आशीर्वाद आणि विश्वास या बळावर आमचे आठच्या आठ उमेदवार यंदा विजयी होऊन खा.शि.मंडळात इतिहास घडणार असल्याची भावना आशीर्वाद पॅनलच्या सर्व उमेदवारांनी व्यक्त केली.
       खा शी मंडळ निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज दिनांक 4 जानेवारी पार पडत असून मतदानाच्या पूर्वसंध्येला आशीर्वाद पॅनलच्या आठही उमेदवारांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी पॅनलचे उमेदवार डॉ.संदेश बिपीन गुजराथी,निरज दिपचंद अग्रवाल ,योगेश मधुसूदन मुंदडा,प्रदिप कुंदनलाल अग्रवाल,हरी भिका वाणी ,डॉ.अनिल नथ्थू शिंदे ,कल्याण साहेबराव पाटील व जितेंद्र मोहनलाल जैन आदी उपस्थित होते.
पॅनलचे निवडणूक चिन्ह पतंग असून संस्थेच्या विद्यमान संचालकांचे हे पॅनल असल्याने दमदार पॅनल म्हणून या पॅनलकडे पाहिले जात आहे.
कोणत्याही परिस्थितीत पूर्ण पॅनलला विजयी करण्याचा निर्धार असल्याने त्यादृष्टीने व्यूहरचना आखली जात आहे.संस्थेत आतापर्यंत झालेला विकास व झालेली शैक्षणिक प्रगती या सदर पॅनलच्या जमेच्या बाजू असून प्रगतीचा लेखाजोखाच मतदारांसमोर मांडला गेला आहे.या पॅनलच्या विजयासाठी रथी महारथी कामाला लागले आहेत.

उमेदवारांना केलेत खालील प्रश्न-

प्रश्न-यंदा आठही संचालक निवडून इतिहास घडणार असे का वाटते?
उत्तर-(डॉ.संदेश गुजराथी)-आशीर्वाद पॅनलमध्ये सर्व घटकांचा समावेश असून संस्थेत आतापर्यंत झालेली विकासकामे आणि संस्थेची प्रगती यामुळेच हा इतिहास घडणार आहे.
प्रश्न-सभासदांनी तुम्हालाच का मतदान करावे?
उत्तर-(नीरज अग्रवाल)-सन 2018 पासून संस्थेत आज पावेतो केलेल्या विकास कामांची विकास पत्रिका आम्ही सभासदांपर्यंत पोहोचवली आहे,त्यात पहिले तर आपल्या संस्थेने शहर व ग्रामीण विद्यार्थ्यांना लाभदायी ठरतील असे आवश्यक कोर्स सुरू केलेत,डी फार्मसी व बी फार्मसी कॉलेजमुळे आपल्या विद्यार्थ्यांना बाहेर गावी जायची गरज राहिली नाही,एमसीए ची इमारत आम्ही केली याठिकाणी आज 60 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.यापुढे शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी सीबीएसई स्कुल सुरू करण्याचा प्रयत्न असून याशिवाय डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याचा आमचा मानस आहे.रोजगाराभिमुख शिक्षण देण्यावर आमचा भर राहणार आहे.
प्रश्न-तुमच्या काळात शैक्षणिक प्रगती काय?
उत्तर-(डॉ अनिल शिंदे)-संस्थेचा पूर्व इतिहास पहिला तर बॉडीत नेहमीच वाद असायचे त्याचा परिणाम प्रगतीवर होत होता,मात्र गेल्या काळात आम्ही एकजूट राहिलो त्यामुळे प्रगती झाली.
आता देखील आमच्या पॅनेलमध्ये आठही लोक वेगवेगळ्या विषयाचे तज्ञ आहेत,मतभेद विसरून आम्ही निर्णय घेतो,संस्थेत सात वर्षात अनेक इमारती नवीन झाल्यात,त्यामुळे विकास बघूनच आम्हाला मतदान होईल. येणाऱ्या काळात उद्योग व रोजगारभिमुख  शिक्षण देण्यावरच आमचा भर असेल.संस्थेचे प्रताप पॅटर्न मेडिकल व इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांना लाभदायी ठरत आहे.यापुढे एमबीए कॉलेज च्या तयारीत आम्ही आहोत,
सर्वत्र चांगला रिस्पॉस आम्हाला असून गुणवत्ता व विकासा यावरच आम्ही बोलतो आहोत.
       शेवटी योगेश मुंदडा यांनी
सर्व सभासदांनी पतंग लाच मतदान करून आशीर्वादच्या आठही उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन केले.