अमळनेर :लोक न्यूज
अमळनेर शहराची ओळख ही नेहमीच शालिनता, नैतिकता आणि सांस्कृतिक जिव्हाळा जपणारे शहर म्हणून राहिली आहे. मात्र सध्याच्या पैशाच्या राजकारणामुळे हे राजकीय शहाणपण हळूहळू गहाण पडत चालले आहे, अशी खंत काँग्रेस पक्षाचे सदस्य संदीप घोरपडे यांनी व्यक्त केली आहे.
राजकीय विरोध करताना वैयक्तिक पातळी ओलांडून विरोधकांच्या कुटुंबीयांवर अश्लील व मानसिक त्रास देणाऱ्या टिप्पणी केल्या जात आहेत, हे अमळनेरसारख्या सुसंस्कृत शहराला शोभणारे नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. पैशाच्या मग्रुरीमुळे काही लोक आपली नैतिक पातळी सोडत असल्याचे चित्र सध्या दिसत असून, अशा प्रकारचा राजकीय व्यवहार आपणास मान्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संदीप घोरपडे म्हणाले की, “मी काँग्रेस पक्षाचा सदस्य म्हणून अनिल भाईदास पाटील यांचा शंभर टक्के राजकीय विरोधक आहे. मात्र राजकीय मतभेद असले तरी त्यांच्या कुटुंबीयांवर केलेला कोणताही हल्ला किंवा अपमानास्पद वक्तव्य मी कधीही मान्य करू शकत नाही. माझ्यासोबत कोणी कसेही वागले, कितीही आक्रमक किंवा खुनशीपणाने वागले तरी मी राजकारणात कुटुंबाला लक्ष्य करणाऱ्या प्रवृत्तीचा विरोधकच राहणार आहे.”
यासोबतच त्यांनी सर्व राजकीय नेते व कार्यकर्त्यांना आवाहन केले की, विरोधकांच्या धोरणांवर, कार्यपद्धतीवर किंवा राजकीय भूमिकेवर टीका जरूर करावी, मात्र त्याच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास होईल, समाजात बदनामी होईल अशा प्रकारची बेताल वक्तव्ये टाळावीत.
अमळनेरच्या राजकीय संस्कृतीला साजेसे वर्तन सर्वांनी करावे, राजकारण हे विचारांचे असावे, वैयक्तिक द्वेषाचे नव्हे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.