लोक न्यूज
दिनांक ३१/१२/२०२५ रोजी अमळनेर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी अशोक हरी खलाणे रा. नेताजी चौक चाळीसगाव ता. चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचे फिर्यादीवरुन आरोपीअनंत रमेश निकम रा.श्रीकृष्ण कॉलनी अमळनेर यांचेविरोधात बीएनएस कायदा कलम ३०८ (२), ३०८ (३) प्रमाणे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सविस्तर घटना अशी की,
चाळीसगाव शहरातील महात्मा फुले सामाजिक शिक्षण विकास मंडळ, चाळीगाव या संस्थेत सचिव या पदावर कार्यरत असुन सदर संस्थेच्या अखत्यारित्या एकुण १४ अनुदानित व विनाअनुदानित शाळा व कॉलेजेस चालविले जातात. महात्मा फुले सामाजिक शिक्षण विकास मंडळ, संचलित जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव या शाळेच्या १५ शिक्षकांच्या गैरवर्तनुकीमुळे शिस्तभंगाची कारवाई करुन त्यांना सेवा समाप्तीचे आदेश फियार्दी यांनी दिलेले होते. सदर शिक्षकांनी शिस्तभंगाची कारवाई केल्याचा राग मनात धरुन संस्थेविरोधात शिक्षण विभागास तक्रारी करुन प्रशासक नियुक्तीचा आदेश करुन घेतलेला होता. प्रशासक नेमण्याच्या आदेशाविरोधात फिर्यादी यांनी मा. उच्च न्यायालयातुन प्रशासक नेमण्याच्या आदेशास स्थगिती करुन घेतली होती. तसेच फिर्यादी यांचेविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यातुन फिर्यादी यांनी जामीन मंजुर करुन घेतलेला असुन सध्या सदर गुन्हे हे न्यायप्रविष्ट असताना देखील दिनांक ०८/११/२०२५ आरोपी अनंत रमेश निकम यांनी फेसबुक अनंत निकम या नावाने असलेल्या प्रोफाईल वरुन फिर्यादी यांचे संस्थेबाबत खोटी बनावट माहीती प्रसारीत केली होती. त्यांनतर दिनांक ०९/११/२०२५ व दिनांक १४/११/२०२५ रोजी आरोपी अनंत रमेश निकम यांनी फिर्यादी यांना आरोपीचे साथीदार मार्फतीने अमळनेर येथे बोलावुन एकुण २५ लाख रुपयाची खंडणीची मागणी केली होती. पैसे नाही दिले तर तुमच्याविरोधात खोटी व बनावट माहीती प्रसारीत करुन, खोटे व्हिडीओ तयार करुन, ते प्रसारीत करुन, तुमच्याविरोधात दखलपात्र, अजामीनपात्र गुन्ह्यात अडकवुन आयुष्यभर तुरुगांत टाकण्याचे फिर्यादी यांना सांगितले होते. तेव्हा फिर्यादी यांनी नगराज चिंतामण वाघ यांना खंडणीची रक्कम कमी करणेबाबत कळविल्याने अनंत निकम यांनी ०४ ते ०५ लाख रुपये द्यावे लागतील असा दम देत असल्याने फिर्यादी यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.
सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी अनंत रमेश निकम यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा.पोलीस निरीक्षक यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड हे करीत आहेत.