लोक न्यूज
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे बसंत गार्डन, पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) यांच्या वतीने आयोजित “बसंत चित्रकला स्पर्धा – २०२५” मध्ये झाडी ता.अमळनेर, जिल्हा जळगाव येथील कन्या. कल्याणी दिनेश पाटील यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
ही स्पर्धा मधमाशी या विषयावर आधारित होती. इयत्ता ८ वी ते १० वी या गटात कल्याणी पाटील यांनी आपल्या कल्पकतेतून व रंगसंगतीतून प्रभावी चित्र साकारत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
या स्पर्धेत राज्यभरातून अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. तरीही कल्याणी यांच्या चित्राने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या यशाबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांना प्रशस्तिपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
कल्याणी यांच्या या यशाबद्दल त्यांचे पालक, शिक्षकवर्ग तसेच परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही त्यांनी कला क्षेत्रात अशीच उज्वल कामगिरी करावी, अशा शुभेच्छा सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत.