लोक न्यूज
अमळनेर: अमळनेर येथील मानव केंद्र येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुनानक जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. स्थानिक प्रबंधक कमिटीकडून आयोजित करण्यात आलेल्या नामसप्ताह कार्यक्रमाची सांगता ५ नोव्हेंबर २०२५ रोजी गुरुनानक जयंतीच्या मंगलदिनी झाली.
सकाळी ठीक ९ वाजता भजन गायनने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
तसेच १०.३० ते ११.३० या वेळेत प्रोजेक्टरवर मौजुदा गुरुदेव संत बलजीत सिहंजी महाराज यांचा सत्संग (प्रवचन) दाखविण्यात आला.
सत्संग प्रसंगी गुरुदेव म्हणाले की, 'सगळ्यांमध्ये एकच परमेश्वर आत्म्याच्या रूपाने वास करतो आहे. आत्मिक रूपाने आपण सर्व एक आहोत. कर्म असे करा की परमेश्वराच्या कृपेस आपण पात्र होऊ, त्याची भक्ती करा.' त्यांनी पुढे सांगितले, 'परमेश्वरासाठी जर का तुम्ही एक पाऊल चाललात तर तो तुमच्यासाठी १० पाऊल पुढे येईल, एकदा चालून तर पहा. देव कुठे बाहेर नाही, दूर नाही, तो आपल्यातच आहे. त्याला ओळखण्यासाठी पूर्ण गुरूची आवश्यकता आहे.' गुरुदेवांनी 'परमेश्वर प्राप्ती सर्वांना शक्य आहे. हा गुरूंचा दरबार आहे, येथे सर्वांना परमेश्वर प्राप्तीची समान संधी उपलब्ध आहे. परमेश्वर भक्ती मार्गावर चालणाऱ्यांच्या नेहमी पाठीशी खंबीरपणे उभा राहतो,' असा मोलाचा उपदेश केला.
सत्संगानंतर जवळपास २००० (दोन हजार) भाविकांनी लंगर महाप्रसादाचा मोठ्या श्रद्धेने लाभ घेतला.
या कार्यक्रमाला माजी जि.प. सदस्य जयश्रीताई पाटील यांनी हजेरी लावून गुरुदेवांचे आशीर्वाद घेतले.
खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अमळनेर तालुक्यासह चोपडा, धुळे व पारोळा येथील जवळपास १०० सत्संगी स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.
यावेळेस केंद्राचे सेवेदार
प्रबंधक योगेश कुमावत, राजेशदादा सोनार, रविंद्र बोरसे साहेब, आनंदा नाना पाटील नंदगाव, दिपक सोनार, गयभू नाना पाटील सनपुले, गिरीधर बापू, विजय पितांबर पाटील, संजय चौधरी ,नंदुभाऊ चौधरी, भगवान चौधरी, नानाभाऊ कुंभार, पप्पू कासार, महाले साहेब पवन चौक ,समाधान पाटील, नंदू पाटील तळवाडे, चेतन वानखेडे मांडळ, श्री चित्ते साहेब, भावसार दादा तांबेपुरा, एस टी पाटील मुडी, पिंटू गिरासे भिलाली, जगदीश निकम रोटवद, सुभाष पाटील पातोंडा, भास्कर आप्पा कुमावत नांद्री, एम जी पाटील पारोळा, राजू महाले एरंडोल, विजय चौधरी धरणगाव, राजूभाऊ पाटील, दिपक पाटील धुळे, बाबुलाल महाजन अंबापिंप्री, युवराज भाऊ देवळी, कल्पना ताई अमळगाव, संतोष दंगल पाटील धुपी, नत्थू मन्साराम गडखांब, जंगलू कुंभार ,नाना वाडिले ,श्रीराम गांगुर्डे ,वाल्हे दादा, मराठे दादा, प्रवीनभाऊ पेंटर, दिलीप मिस्त्री, बिरजू, मुकेश, सदाशिव भाऊ, सिंधी बांधव इतर अनेक सत्संगी बंधू-भगिनी उपस्थित होते.
हा कार्यक्रम या भागातील आध्यात्मिक आणि धार्मिक उत्साहाचे प्रतीक ठरला.