लोक न्यूज
जळगाव, दि. १५ : पारोळा पोलीस स्टेशन हद्दीत नोंदवलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने धुळे जिल्ह्यातील लामकाणी येथून मनोज पाडुरंग गायकवाड या आरोपीस जेरबंद केले. आरोपीकडून एकूण तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या सूचनेनुसार विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली होती. या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत आरोपी गायकवाड लामकाणी येथे असल्याची माहिती मिळताच तत्काळ कारवाई करण्यात आली. ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीने होंडा शाईन व दोन युनिकॉन अशा एकूण तीन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
जप्त वाहनांबाबत पारोळा पोलीस स्टेशन व जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. जितेंद्र वल्टे, पोह. विष्णु विहाडे, पोह. दिपक माळी, पोह. रविंद्र पाटील, पो.अं. रावसाहेब पाटील आणि स्था. गु. शा. जळगाव पथकातील सर्व कर्मचारी यांनी केली.