लोक न्यूज
अमळनेर:- आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय तापमान वाढले असताना नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून जितू ठाकूर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. सर्वसामान्य कुटुंबातून स्वबळावर पुढे आलेल्या आणि शहरातील दैनंदिन समस्यांची प्रत्यक्ष जाण असलेल्या जितेंद्र ठाकूर यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असून शहरभरात जितेंद्र ठाकूर यांच्या इच्छुक उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चेला उधाण आले आहे.
जितेंद्र ठाकूर यांनी गेल्या दोन दशकांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, नालेसफाई, कचरा व्यवस्थापन, तसेच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर आवाज उठवून जनतेची गैरसोय थांबवली आहे. या दरम्यान त्यांनी केलेल्या ह्या प्रयत्नामुळे ते ‘जनतेचा उमेदवार’ म्हणून ओळख मिळवतात आहेत. शहरातील सर्वच भागांत तसेच राजकीय, सामाजिक व इतर क्षेत्रात जितू ठाकूर ह्या नावाला सर्वच जण ओळखतात.
शहराच्या विकासाचे ठोस व्हिजन...
शहराच्या सर्वांगीण विकासाचे ठोस व्हिजन, नागरिकांच्या छोटे-छोटे प्रश्न सोडवण्यासाठी तत्परता, तसेच कोणत्याही वैमनस्यापलीकडे जाऊन काम करण्याची त्यांची ओळख अनेक मतदारांना भावली आहे. “शहराचा सामान्य माणूस कोणत्या अडचणींना रोज सामोरे जातो, याची प्रत्यक्ष जाण जितू ठाकूर यांना आहे,” असे अनेक नागरिक सांगताना दिसतात.
नागरिकांसह युवा मतदारांचा ही मिळतोय प्रतिसाद
शहरातील व्यापारपेठ, बाजार परिसर तसेच नव्याने विकसित होणाऱ्या भागातूनही त्यांच्या नावाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. युवा मतदारांमध्येही त्यांच्या नावाबाबत उत्सुकता असून, "शहर बदलायचं असेल तर स्थानिक आणि काम करणारा नेता हवा," अशी भावना व्यक्त होते आहे. शहरातील विकासकार्यात पारदर्शकता, जवाबदारी आणि नागरिकांशी संवादावर आधारित प्रशासन देण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचे जितू भाऊ समर्थकांचे म्हणणे आहे. ह्या निवडणुकीत जितेंद्र ठाकूर यांना मिळणारा प्रतिसाद पाहून आजच त्यांचा विजय नक्की असल्याचे समर्थकाकडून सांगण्यात येत आहे.