लोक न्यूज
अमळनेर, दि. ११ ऑक्टोबर २०२५ —मौजे आर्डी – जवखेड़े रस्त्यावर आज महसूल विभागाच्या पथकाने अनधिकृतपणे गौण खनिज (वाळू) वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर कारवाई केली. सदर कारवाई मा. उपविभागीय अधिकारी अमळनेर विभाग श्री. नितीनकुमार मुंडावरे साहेब व मा. तहसीलदार अमळनेर श्री. रुपेशकुमार सुराणा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपासादरम्यान दोन ट्रॅक्टर अनधिकृतरीत्या वाळूची वाहतूक करताना आढळून आले. महसूल पथकाने तत्काळ कारवाई करून दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेतले असून मुद्देमालासह तहसील कार्यालय, अमळनेर येथे जमा करण्यात आले आहे.
या कारवाईत महसूल विभागाच्या पथकातील श्री. पी. एस. पाटील (मंडळ अधिकारी, वावडे) तसेच ग्राम महसूल अधिकारी श्री. संदीप माळी (मांडळ), श्री. एम. आर. पाटील (जैतपीर), श्री. विक्रम कदम (शाहपुर), श्री. जितेंद्र पाटील (शिरसाले बु), श्री. विकेश भोई (बाम्हने), श्री. अमोल चक्रे (जवखेड़े), श्री. आकाश गिरी (पातोंडा), श्री. सुधीर पाटील (गडखाब) व श्री. पवन शिंगारे (सावखेड़े) यांनी सहभाग घेतला.