लोक न्यूज
अमळनेर, ता. २१ : आमदार अनिलदादा पाटील व माजी जि.प. सदस्या सौ. जयश्री पाटील यांचा बालेकिल्ला असलेला कळमसरे–प्र.डांगरी जिल्हा परिषद गट खुला झाल्याने या गटात गौतम अनिल पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी युवा पदाधिकाऱ्यांनी केली आहे.अमेरिकेतून कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन देशात परतलेले आणि कुटुंबाचा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळणारे गौतम पाटील हे सुसंस्कृत, सामाजिक व प्रगतिशील विचारांचे तरुण नेते म्हणून ओळखले जातात.
या मागणीसाठी गटातील युवा कार्यकर्त्यांनी आमदार अनिल पाटील यांना निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष करण साळुंखे, गौरव रावसाहेब पाटील, संग्राम पाटील, कल्पेश साळुंखे, योगेश पाटील, चेतन चौधरी, सचिन साळुंखे, ऋषिकेश पाटील, पीयूष वानखेडे, दर्शन सुर्वे, लोकेश झंवर, सनी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
युवा कार्यकर्त्यांनी विश्वास व्यक्त केला की, “गौतम पाटील यांना संधी दिल्यास आम्ही ती यशस्वी करून दाखवू.”