लोक न्यूज
अमळनेर:-वर्षभर फक्त जनसेवा हेच कर्तव्य असणाऱ्या पालिकेच्या विविध कामगारांना भेटवस्तू देऊन सत्कार करत त्यांची दिवाळी गोड करण्याचा स्तुत्य उपक्रम
प्रभाग क्रमांक 1 चे माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी आपल्या प्रभागात राबविला.
      गेल्या अनेक वर्षांपासून नित्यनियमाने हा उपक्रम ते राबवित असून या उपक्रमामुळे कामगारांना अजून जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळत असते.केलेल्या कामानंतर कुणीतरी केवळ कौतुकाची थाप पाठीवर ठेवावी एवढीच त्यांची अपेक्षा असते.यासाठीच यासाठी श्री चौधरी हा उपक्रम राबवित असतात.
      यंदा नगरपालिकेचे साफसफाई कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी, नगरपरिषद दिवाबत्ती विभाग  कर्मचारी  दिवाळी सप्रेम भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांच्या आनंदात सहभागी होऊन सोबत दिवाळी साजरी केली.या उपक्रमाबद्दल सर्वानी त्यांचे आभार व्यक्त केले.