लोक न्यूज
अमळनेर (प्रतिनिधी) — शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर शहरात गेल्या काही दिवसांत प्रशासनावरील हल्ल्यांची मालिका चिंतेचा विषय ठरत आहे. वाळू माफियांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली असून, या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी अनधिकृत वाळू उपसा थांबवण्यासाठी कारवाईसाठी गेले असता, वाळू तस्करांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. काही कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापती झाल्या असून, संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, तसेच वाळू माफियांच्या वाढत्या दबदब्याला आळा घालावा, अशी मागणी केली आहे. याच दरम्यान, लोकप्रतिनिधी या घटनेवर मौन बाळगत असल्याची नाराजी जनतेत व्यक्त होत आहे.
एकेकाळी शिक्षण आणि सामाजिक चळवळींसाठी प्रसिद्ध असलेल्या अमळनेर शहरात आज गुन्हेगारी प्रवृत्तीचा वाढता प्रभाव दिसून येतो आहे. नागरिक म्हणतात — “प्रति पंढरपूर, मंगळदेव भगवान... शिक्षणाची पंढरी कुठे नेऊन ठेवलं आमचं अमळनेर?”