लोक न्यूज
उदयनगर (ता. अमळनेर—, जि.जळगाव —): समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत लोकसहभागातून ग्रामविकासाचे सुंदर उदाहरण उदयनगर येथे पाहायला मिळाले. ग्रामपंचायत, ग्रामस्थ, विविध स्वयंसेवी संस्था आणि शासकीय अधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नातून सोमवार, दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी श्रमदानातून वनराई बंधारा उभारणीचा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाचे मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले. त्यांच्या प्रेरणेने ग्रामविकासात लोकसहभागाचे बळ वाढविण्यासाठी “समृद्ध पंचायत राज अभियान” राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत उदयनगर ग्रामपंचायतीने जलसंधारण आणि पर्यावरण संरक्षणाचा उद्देश ठेवून श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला.
या उपक्रमासाठी गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, लोकनियुक्त सरपंच प्रकाश वाघ, उपसरपंच राकेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील, सुदाम सोनवणे, ग्रामपंचायत अधिकारी सोनी पाटील, तसेच गावातील विविध स्वयंसेवी संस्था, स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास वि.का.सह. सोसायटीचे माजी चेअरमन परशुराम पाटील, माजी सरपंच देविदास खैरनार, डॉ. सामाजिक कार्यकर्ते राजेश वाघ, जितेंद्र पाटील, भास्कर कापडणे, राजेंद्र पुंडलिक पाटील, किशोर चव्हाण, सुभाष पाटील, तलाठी दीपक पाटील, कृषी सहाय्यक रोहिदास भामरे यांच्यासह माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एच. एस. पाटील व शिक्षक वृंद, मराठी शाळेचे मुख्याध्यापक मासुळे सर व शिक्षक वृंद, रोजगार सेवक सागर सोनवणे, शिपाई राकेश कापडणे, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा वर्कर, तसेच ग्रामस्थ, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
श्रमदानाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यामुळे पाण्याचा साठा वाढून शेतीसाठी पाणी उपलब्धता सुधारेल, भूजलपातळी उंचावेल, तसेच पर्यावरण संरक्षणाला चालना मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
कार्यक्रमानंतर “स्वच्छतेचा वार – सोमवार” या संकल्पनेतून गावात स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली. गावातील सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर, रस्ते आणि नाल्यांची स्वच्छता करण्यात आली.
लोकसहभागातून राबविण्यात आलेला हा उपक्रम ग्रामविकासाच्या दृष्टीने एक आदर्श नमुना ठरला असून, भविष्यातील विकासकामांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.