लोक न्यूज
अमळनेर : आगामी नगरपरिषद निवडणूकीत महायुती सोबत किंवा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून लढून नागरपालिकेवर झेंडा फडकवायचा आहे. त्यामुळे जनतेच्या मनातले आणि सर्वांना सहमत असे उमेदवार द्यायचे आहेत. या बैठकीला गैरहजर असलेले देखील उमेदवार असू शकतात असा इशारा आमदार अनिल पाटील यांनी नपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिला. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या गटातील अनेक कार्यकर्त्यांनी अनिल पाटील यांच्या गटात प्रवेश केला.
आगामी नगरपरिषदेची निवडणुक महायुती अथवा महायुती प्रणित आघाडीच्या माध्यमातून लढवावी का? याबाबत इच्छुक उमेदवार व इतर कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या गटातील काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांचे आमदार पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार पाटील म्हणाले की सदर बैठक म्हणजे चाचपणी असून यानंतर भाजप असेल,राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल प्रत्येक पक्षाची स्वतंत्र बैठक होऊन योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.यात अमळनेर वर प्रेम करणाऱ्या क्रियाशील कार्यकर्त्यांना देखील सोबत घ्यावे ही आमची सर्वांची भूमिका आहे.आपल्या उमेदवारांनी आतापासूनच कामाला लागावे,खासदार स्मिता वाघ व माजी आमदार साहेबराब पाटील यांच्याशीही मी चर्चा करणार असून सर्व प्रमुख लोकांशीही चर्चा होणार आहे.उमेदवाराने
आपल्याला प्रभागाचा अभ्यास आहे का हे स्वतः तपासले पाहिजे.नसेल तर उभे राहू नका,मी स्वतः मुलाखती घेणार आहे.इच्छा असावी पण त्याबरोबरच स्वतःला तापसलेही पाहिजे.आपले नाव लोकांमधून येऊ द्या,आम्हीही तसे सर्व्हे करणार आहोत.गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्व्हे मध्ये अर्धा टक्के मत नसेलेले लोकही आमदारकीसाठी इच्छुक होते तसे व्हायला नको.तुम्हाला तोंडावर सगळे हो सांगतील पण सर्वांवर विश्वास ठेवू नका,आपले मत पब्लिक मधून येऊ द्या,सर्व जाती धर्माना सोबत घेण्याची आपली भूमिका असावी.तसेच
निवडून आल्यावर बदलू नका आणि आतातरी बाहेरच्या लोकांनी कितीही दिशाभूल केली तरी बळी पडू नका असे आवर्जून सांगितले.तसेच आपल्या अमळनेर चा माणूस तीच आपली जात व धर्म असून गेल्या काळात संघर्ष आपण सर्व मिळून केला आहे. पुढील संघर्ष टाळण्यासाठी तालुका म्हणून एकत्र यावे लागेल.पुढील काळात विकासाचे खुप व्हिजन आपल्या समोर आहेत.
ज्यांनी ज्यांनी प्रामाणिक काम केले असेल त्यांच्या पाठीशी मी उभा राहणार आहे.
सदर बैठकीत माजी मनोज पाटील, विक्रांत पाटील,प्रताप शिंपी,नरेंद्र संदानशिव,सलीम टोपी,निलेश भांडारकर,चेतन राजपूत,राजू फाफोरेकर,बाळा पवार,शितल देशमुख,कैलास पाटील,सोमचंद संदानशिव यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केले.
यांचा झाला प्रवेश
सदर बैठकीत माजी नगरसेवक सलीम शेख(टोपी),फिरोज मिस्तरी,ऍड सुरेश सोनवणे,नावेद शेख,नितेश लोहरे,इम्रान हाजी कादर शेख तसेच मुकेश शिवदास बिऱ्हाडे यांच्या सोबत असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.सदर प्रवेशामुळे माजी आमदारांच्या गटाला ऐन निवडणूकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला असून आमदार अनिल पाटील यांची ताकद मात्र वाढली आहे.