अमळनेर – लोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नारी शक्ती’ अभियानाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासदृष्टीला अभिवादन करण्याच्या उद्देशाने अमळनेर शहरात रक्षाबंधनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. खासदार स्मिता उदय वाघ यांचे अमळनेर येथील चिकाटे गल्ली कार्यालय,येथे भाजपा महिला मोर्चा च्या वतीने हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सोहळ्याला भाजपा पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्ते तसेच शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार स्मिता वाघ यांनी स्वतः कार्यकर्त्यांना व नागरिकांना राखी बांधून बंधुत्व, ऐक्य व सद्भावनेचा संदेश दिला. तसेच भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भैरवी वाघ यांनीही राखी बांधत सणाचा आनंद अधिकच रंगतदार केला. महिला आघाडीच्या भारतीताई सोनवणे प्रदेश परिषद,माधुरीताई पाटील महिला मोर्चा,मीनाताई पाटील माजी जि प सदस्य,रेखाताई पाटील माजी सभापती,वसुंधराताई लांडगे खाशी संचालक,छायाताई पाटील,कविताताई जाधव,शितलताई पाटील, योगिताताई पांडे पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना रक्षाबंधन करून महिलांच्या शक्तीचा, ऐक्याचा आणि परस्पर सन्मानाचा उत्सव साजरा केला.
कार्यक्रमात बोलताना खासदार स्मिता वाघ म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नारी शक्ती’ अभियानाद्वारे महिलांच्या सक्षमीकरणाचा एक नवा व ऐतिहासिक अध्याय सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख धोरणांमुळे महाराष्ट्रातील महिलांच्या प्रगतीसाठी भक्कम पाया रचला गेला आहे. रक्षाबंधनासारखे सण केवळ आपली भावनिक नाती घट्ट करत नाहीत, तर समाजात ऐक्य, परस्पर विश्वास आणि राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा देतात.”
या सोहळ्याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि ऐक्याचा संदेश देत रक्षाबंधनाचा सण खऱ्या अर्थाने ‘नारी शक्ती’ला समर्पित करण्यात आला.