लोक न्यूज

अमळनेर : मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या उपक्रमात अमळनेर उपविभागीय कार्यालयाने नाशिक विभागात  प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते डी ए धनगर यांनी उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे साहेब यांचा पोलीस उपविभागीय अधिकारी विनायकराव कोते साहेब, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा साहेब  यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
     भौतिक सुविधांसह जनतेला  तत्पर सेवा , प्रलंबित  प्रकरणांचा निपटारा , कार्यालयातील सुविधा , जनतेप्रति कर्मचाऱ्यांची वागणूक असे काही निकष देण्यात आलेले होते. यात उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी पिण्याचे शुद्ध पाणी ,रेकॉर्ड रूम अद्ययावत करून त्याचे संगणकीकरण करणे , जेष्ठ नागरिकांची प्रकरणाचा तात्काळ निपटारा केल्याने आणि जनहिताच्या निर्णय घेतल्याने अमळनेर उपविभाग नाशिक विभागात प्रथम आला आहे. उपविभागीय कार्यालय नाशिक विभागात प्रथम आल्याने प्रांत नितीनकुमार मुंडावरे यांचा सामाजिक कार्यकर्ते डी, ए, धनगर यांनी सत्कार केला.
       यावेळी मुख्याधिकारी तुषार नेरकर ,  पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, गटविकास अधिकारी एन आर पाटील , गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी , सार्वजनिक बांधकाम विभाग , भूमिअभिलेख विभाग अधिकारी हजर होते