अमळनेर : तालुक्यातील अंतुर्ली परिसरातील शेतांमधून अज्ञात चोरट्यानी आठ जणांच्या विहिरीवरून ४१ हजार ६०० रुपयांच्या केबल वायरी चोरून नेल्याची घटना २१ रोजी रात्री घडली.
अंतुर्ली परिसरातील राहुल किशोर पाटील , लोटन दौलत पाटील , कैलास वसंत पाटील ,भटू सुरेश पाटील , देविदास एकनाथ पवार , दीपक माणिक पाटील , नवनीत जगन्नाथ पाटील , एकनाथ निंबा पाटील यांच्या सर्वांच्या शेतातील विहिरींवरून सुमारे १६४० फूट ४१ हजार ६०० रुपयांच्या केबल वायरी अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्या आहेत. याबाबत राहुल पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.