लोक न्यूज
दिनांक 16 मे 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मांडळ येथे राष्ट्रीय डेंगू दिवस साजरा करण्यात आला.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी व तालुका आरोग्य पर्यवेक्षक प्रशांत फुगे यांच्या मार्गदर्शनाने यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते " या वर्षाचे घोषवाक्य" 'तपासा स्वच्छ करा आणि झाकून ठेवा डेंग्यूला हरविण्याचे उपाय करा' यावेळी सर्व आशा सेविकांची कार्यशाळा घेण्यात आली तसेच डेंग्यू बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली कंटेनर सर्वेचे महत्त्व सांगण्यात आले.डेंगू दिवस यशस्वीरिता पार पाडण्यात आला यावेळी आरोग्य निरीक्षक बी जी सपकाळ आरोग्य सहाय्यक एस एच थोरात आरोग्य सहायिका . आरोग्य सेवक औषध निर्माण अधिकारी व सर्व कर्मचारी वृंद व सर्व अशा सेविका कार्यक्रमास उपस्थित होते.
