लोक न्यूज

  लोण चारम ता. अमळनेर :- येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. सरिता निंबाजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
        यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी. एस. पाटील यांनी काम पहिले तर ग्रामसवेक विनोद पाटील, तलाठी भूषण पाटील यांचे सहकार्य लाभले. या निवड प्रसंगी बाजार समितीचे सभापती अशोक पाटील,लोण बु. माजी लोकनियुक्त सरपंच कैलास पाटील, साळूंखे सर, निंबाजी पाटील, ताराचंद पाटील, माजी सरपंच मंदा पाटील, सीमा पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते. बाजारसामितीचे सभापती अशोक पाटील, काशिनाथ पाटील, सुरेश पाटील, शालिक पाटील, विवेक पाटील, प्रदीप पाटील, युवराज पाटील, यांनी सत्कार केला यावेळी गावात मिरवणूक काढण्यात आली.