लोक न्यूज

  अमळनेर को.ऑप.अर्बन बँक लि. बँक शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करत असतांना  बँकेने या आर्थिक वर्षात ढोबळ नफा ११२ लक्ष रुपये मिळविला आहे.बँकेच्या ९९ वर्षाच्या इतिहासातील उत्कृष्ट कामगिरी साध्य करीत १०७ कोटींचा व्यवसायाचा टप्पा गाठत ऐतिहासिक उदिष्ट पूर्ती साध्य केली असल्याचे चेअरमन पंकज गोविंद मुंदडे व व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे यांनी सांगितले आहे.
                दि अमळनेर अर्बन बँकेच्या स्थापनेला ९९ वर्ष पूर्ण होत असून बँक शतक महोत्सवी वर्षात प्रवेश करीत आहे.यंदाच्या आर्थिक वर्षात बँकेने प्रथमच ११२ लाखांचा ढोबळ नफा मिळविला आहे. तर सर्व कायदेशिर व आवश्यक तरतूदी करून बँकेने निव्वळ नफा रु.८५.८५ लक्ष इतका राखलेला असून बँकेने स्थापनेपासून प्रथमच इतका निव्वळ नफा मिळविला आहे.बँकेने यंदाच्या वर्षात १०७ कोटीं रुपयांच्या उच्चांकी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केलेला आहे. विशेषतः कर्ज व्याजदरांमध्ये कपात करून बँकेने सदरचा नफा मिळविला आहे. बँकेचा नेट एनपीए हि सर्वाधिक कमी झाला असून बँकेचा एनपीए केवळ २.१४ टक्के राहिला असून याच आर्थिक वर्षात अमळनेर अर्बन बँकेकडून आर्थिक दृष्ट्या सक्षम व उत्कृष्ट व्यवस्थापनाचे (FSWM) सर्व मापदंडांची पूर्तता झालेली आहे अशी माहिती बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांनी दिली आहे.
            बँकेच्या या घवघवीत यशात बँकेचे सभासद ठेवीदार,कर्जदार व हितचिंतक यांनी केलेल्या सहकार्याबद्दल संचालक मंडळाने आभार व्यक्त केले आहे.सभासदानी निवडणुकीत संचालकपदाचीसंधी देत अर्बन बँकेचे विश्वस्त म्हणून दिलेल्या जबाबदारीला व बँकेच्या चेअरमन, व्हॉईस चेअरमन पदाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे.अशी प्रतिक्रिया चेअरमन पंकज गोविंद मुंदडे व व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे यांनी दिली आहे.
              याप्रसंगी बँकेने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल चेअरमन पंकज मुंदडे व व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे यांनी बँकेचे कार्यकुशल,अभ्यासू व्यवस्थापक अमृत पाटील व जेष्ठ संचालकांसह उपस्थित सर्व कर्मचारी वर्गाला पेढे भरवून मिळविलेल्या यशाचा आनंद साजरा केला. याप्रसंगी बँकेचे संचालक प्रविण जैन,मोहन सातपुते, पंडित चौधरी,प्रदिप अग्ररवाल,लक्ष्मण महाजन, अभिषेक पाटील, प्रविण पाटील आदिंसह संचालक उपस्थित होते.या यशासाठी बँकेचे संचालक भरत ललवाणी, दिपक साळी,सौ.वसुंधरा लांडगे,सौ. मनिषा लाठी, तज्ञ संचालक ॲड. व्ही आर पाटील,विजय बोरसे यांनीही कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.   
                 बँकेच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ,तसेच व्यवस्थापकांचे व कर्मचाऱ्यांचे प.पु.संत प्रसाद महाराज यांनी आशिर्वाद देऊन अभिनंदन केले तर आमदार अनिल भाईदास पाटील, खा.स्मिताताई वाघ,बँकेचे माजी पदाधिकारी गोविंद मुंदडे, कुंदनशेठ अग्रवाल, विनोद पाटील, प्रविण पाटील,बजरंग अग्रवाल,सुभाष चौधरी,प्रभाकर कोठवदे, शशांक जोशी,अजय केले,लालचंद सेनानी तसेच बँकेचे प्रतिष्ठित ग्राहक सुरजूशेठ गोकलानी, प्रकाश मुंदडा,रामदास निकुंभ, प्रशांत निकम,जितेंद्र जैन, प्रयांक पटेल, खा.शि.मंडळाचे चेअरमन डॉ.संदेश गुजराथी, व्हॉईस चेअरमन निरज अग्रवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील आदिनी अभिनंदन केले आहे.