लोक न्यूज
अमळनेर :  साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये हिंदी भाषे अंतर्गत पत्र लेखन  उपक्रम राबविला गेला. कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे हे अध्यक्षस्थानी होते.
    प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका  अनिता बोरसे होत्या. हिंदी शिक्षक दिलीप पाटील यांनी पोस्ट कार्डद्वारे पत्र लेखन ही संकल्पना विद्यार्थिनींना सांगितली व विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाल्या. पोस्ट ऑफिस मधून १५०  पत्र आणून विद्यार्थिनींना देण्यात आले.  आजचे युग डिजिटल युग असतांनाही विद्यार्थ्यांनी पत्र लिहून पालकांशी भावनिक संवाद साधला. ह्या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील व संस्थेचे संचालक मंडळ यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.