अमळनेर येथील शिवाजी महाराज नाट्यगृहातील अहिराणी सेवा गुलाबराव पाटील साहित्य नगरीत पाचवे अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन खान्देशचे कुल दैवत कानबाईची पूजनाने करण्यात आले.
भाषांमध्ये सर्वांची माता अहिराणी आहे. जगभर अहिराणीचा गोडवा सर्वजण मिळून जपायाला हवेत.खान्देशात जन्मलेला उपजतच अहिराणी बोलायला लागतो हे खान्देशी माणसाचे वैशिष्ट्य आहे.येणाऱ्या काळात विधिमंडळात आणि येणाऱ्या पिढ्यांपर्यंत अहिराणी पोहचवण्यासाठी प्रयत्न करू असे आवाहन आ. अनिल पाटील यांनी केले.
खान्देशी शेतकऱ्याच्या वेशात मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी पुष्पहार अर्पण करून केले. यावेळी बोलताना अहिराणी ला राजपत्रित भाषेचा दर्जा मिळावा अशी अपेक्षा डॉ.डीगंबर महाले यांनी व्यक्त केली. याप्रसंगी महा.राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ.श्यामकांत देवरे,छ संभाजी नगरचे सहा.आयुक्त अर्चना राजपूत,
इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे आदींनी अहिराणीतून साहित्य संमेलनाला शुभेच्छा दिल्यात.अहिराणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले की अमळनेर ही साहित्य व सांस्कृतिक चळवळीच्यादृष्टीने अहिराणीची राजधानी आहे. अहिराणीच्या राजधानीत भरगच्च गर्दीने होणारा अहिराणीचा जागर हा गौरवास्पद आहे. प्रा.डॉ.लिलाधर पाटील यांनी यावेळी बोलतांना अहिराणी जनतेच्या प्रेमाने संमेलन यशस्वी होणार या विश्वासाने संमेलन अमळनेरला आयोजित केले असे सांगितले. सूत्रसंचलन सौ वसुंधरा लांडगे,शरद पाटील यांनी केले.उद्घाटन सत्राचे आभार प्रदर्शन मुख्य समन्वयक रणजित शिंदे यांनी केले.
याप्रसंगी मंचावर लोककवी प्रशांत मोरे,मा.आ.डॉ.बी एस पाटील, मा.जि.सदस्या जयश्री पाटील, कृ उ बा सभापती अशोक पाटील, सचिव प्रभाकर शेळके ,डॉ. फुला बागुल,अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, खानदेश साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ. सदाशिव सूर्यवंशी, सुदाम महाजन ,अहिराणी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष डी डी पाटील , कार्याध्यक्ष प्रा अशोक पवार मुख्य संयोजक लिलाधर पाटील ,मुख्य समन्वयक रणजित शिंदे,कोषाध्यक्ष बापुराव ठाकरे, उपाध्यक्ष डी ए पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
साहित्य संमेलनाच्या भव्य मंचावर ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील ,मेळघाट येथील अहिराणी लेखक व संजय गायन यांना अहिराणी साहित्य भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अहिराणी चा प्रचार प्रसार करणारे स्टार गायक गीतकार अहिराणी कलाकार असलेले इंदिरा नेतकर, दीपक पवार, दीपक खंडाळे पाटील ,संतोष पाटील ,विजय पवार, गरबड अहिरे , अशोक पाटील, रवी बॉडीगार्ड, विलास कुमार शिरसाट ,कैलास चव्हाण , डॉ दत्तात्रय ठाकरे ,ईश्वर माळी ,जयराम मोरे संदिप भोई आदींना अहिराणी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर मंचावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार टोपी,टावेल व अहिराणी पुस्तक देऊन करण्यात आला. समारंभाच्या यशस्वीतेसाठी, डॉ.माणिक बागले,संजय सूर्यवंशी, प्रा. डॉ.प्रशांत पाटील,रामेश्वर भदाणे, प्रेमराज पवार गौतम मोरे निरंजन पेंढारे, महेश पाटील, रत्ना भदाणे, दिशा संदानशिव, सुनिता मोरे,रजनी पाटील,मेघा पाटील,सुनंदा पवार ,हेमंत अहिरराव , चंद्रकांत देसले आदींनी परिश्रम घेतले,
लोक न्यूज