लोक न्यूज
अमळनेर ः अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक) स्तर अंतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील १५७ विशेष शिक्षकांना थकित वेतन मिळाले आहे. याबाबत अॅड. योगेश यांनी विविध न्यायालयात लढा दिला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, बारा वर्षांनंतर हे विशेष शिक्षक आनंदाची गुढी उभारणार आहेत.अॅड. योगेश एम. पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयासह, नागपूर, तसेच औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या अवमान याचिकेमुळे त्यांना न्याय मिळाला आहे.या योजनेत राज्यातील १००० पेक्षा जास्त विशेष शिक्षक पगाराविना मागच्या १२ वर्षांपासून ते काम करीत असताना २४ वेळा तपासणीत पात्र होते. मात्र, २५ व्या तपासणीत त्यांना चुकीच्या पध्दतीने निकष लावून अपात्र करण्यात आल्याने शिक्षकांनी व्यथित होऊन अॅड. योगेश एम. पाटील यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयासह नागपूर खंडपीठ तसेच औरंगाबाद खंडपीठात अवमान व रिट याचिका दाखल केल्या. अवमान याचिकेत विशेष शिक्षकांच्या वास्तवतेवर न्यायालय यांचे लक्ष केंद्रीत करीत असतांना शासकीय यंत्रणा यांच्या सोबत योग्य तो न्यायीक समन्वय साधत १५७ विशेष शिक्षकांना १२ वर्षाचे थकीत वेतन मिळवून देण्यात अॅड. योगेश एम. पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले. १२ वर्षानंतर राज्यातील १५७ विशेष शिक्षकांच्या कुटूंबासाठी थकित वेतन मिळाल्याने या वर्षाचा गुढीपाडवा नक्कीच त्यांच्या करीता नाविन्यपुर्ण साजरा करण्याचा योग शिक्षकांसह त्यांचा कुटूंबाला मिळाला. याकरीता राज्यभरातील सर्व विशेष शिक्षक वर्गामधून अॅड. योगेश एम. पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले.