लोक न्यूज
अमळनेर-अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन येथील प्रताप महाविद्यालयातील मागासवर्गीय समाजाची विद्यार्थिनी लीना दिलीप शिरसाठ हिने अंत्यत कठीण समजली जाणारी 'जाम" 2025 परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण करून भारतातील टॉपर समजल्या जाणाऱ्या कोणत्याही आयआयटी इन्स्टिट्यूट मध्ये उच्च शिक्षण घेण्याची द्वारे तिने खुली केली आहेत.
      कु लीना ही अमळनेर तालुक्यातील मारवड येथील मूळ रहिवासी असून तिचे वडील दिलीप शिरसाठ हे प्रताप महाविद्यालयात रोजंदारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत,तर लीना ही बी एस्सी स्टॅटिस्टिक फायनल ला आहे.परिस्थिती गरिबीची असली तरी गुणवत्तेच्या बळावर आपले पुढील एम एस्सी चे शिक्षण भारतात शिक्षण क्षेत्रात टॉपर समजल्या जाणाऱ्या 6 पैकी कोणत्याही आयआयटी इन्स्टिट्यूट मध्ये व्हावे अशी तिची इच्छा होती.यासाठी पात्र ठरण्यासाठी आवश्यक असलेली जाम 2025 या परीक्षेची जिद्दीने तयारी तिने केली आणि अहोरात्र अभ्यास केल्याने तिच्या मेहनतीला फळ येऊन या परीक्षेत ती पात्र ठरली.12.67 तिचा स्कोअर असून ऑल इंडिया रँक तिची 398 आली आहे.विशेष म्हणजे जनरल प्रवर्गासाठी 8.75 हा पात्रता स्कोअर असताना लिना हिने त्यापेक्षाही अधिक उत्तम गुणांकन मिळविल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
      तिला प्रताप महाविद्यालयातील स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट च्या सर्व प्राध्यापक वृंदाचे मार्गदर्शन लाभले असून तिच्या या यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, प्राचार्य,प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.