लोक न्यूज
नवी दिल्ली – आज खासदार स्मिता वाघ यांनी आपल्या कुटुंबासह भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांच्याकडून शुभाशीर्वाद प्राप्त केला. या विशेष प्रसंगी पंतप्रधान मोदीजींसोबत झालेली भेट ही त्यांच्यासाठी अत्यंत गौरवशाली आणि संस्मरणीय ठरली.
या अनमोल क्षणाविषयी भावना व्यक्त करताना खासदार स्मिता वाघ म्हणाल्या, "विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रेरणादायी नेत्याकडून आशीर्वाद घेण्याचा सन्मान मला मिळाला, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. हा वाढदिवस मला आयुष्यभर स्मरणात राहील."