अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील फ्रेंड्स कबड्डी संघ यांच्या वतीने आयोजित ५० किलो वजनी गट कबड्डी स्पर्धा मोठ्या जल्लोषात पार पडली. ही भव्य डे-नाईट कबड्डी स्पर्धा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील नामांकित ३९ संघांच्या सहभागाने रंगतदार ठरली.
२२ रोजी स्पर्धेचे उद्घाटन माजी मदत व पुनर्वसन मंत्री व आमदार अनिल पाटील यांच्याहस्ते पार पडले.आ पाटील यांनीही मैदानात उतरून रेड करत खेळाडुंचा उत्साह वाढविला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून डॉ.प्रशांत शिंदे, परेश शिंदे, राजेश जयवंतराव साळुंखे, अनिल पाटील, उमाकांत साळुंखे, चेतन पाटील, भिकन सिद्धपुरे, करण साळुंखे, सचिन बेहरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तसेच मारवड ग्रामस्थ मंडळ व पंचक्रोशीतील कबड्डीप्रेमी युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या स्पर्धेत महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील नामवंत ३९ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला. २३ रोजी सकाळी नऊ वाजता अंतिम सामन्याचे व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक जय बजरंग क्रीडा मंडळ कापुसवाडी, जामनेर यांनी पटकावला तर द्वितीय क्रमांक सेवालाल क्रीडा मंडळ गाळण, पाचोरा, तृतीय क्रमांक फ्रेंड्स कबड्डी संघ मारवड व चतुर्थ क्रमांक जय बजरंग क्रीडा मंडळ धमाने शिंदखेडा यांनी पटकावले. तसेच स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक कामगिरीसाठी गौरवण्यात आले. यात पब्लिक हिरो पियुष पाटील (फ्रेंड्स कबड्डी संघ मारवड), बेस्ट रीडर अजय वाघ (धमाने),
मॅन ऑफ द सिरीज म्हणून रोहन पाटील (कापूस वाडी), बेस्ट डिफेंडर म्हणून गणेश राठोड (गाळण) यांना सन्मानित करण्यात आले. या समारोप सोहळ्याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांच्यासह लोकनियुक्त सरपंच आशाबाई भील, प्रा. सुरेश पाटील, एस डी देशमुख सर, उमाकांत साळुंखे, राजेश साळुंखे, अनिल पाटील, डॉ. विलास पाटील, राकेश गुरव, अरुण शिंदे, व अन्य मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन एल जी चौधरी यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फ्रेंड्स कबड्डी क्लब व राष्ट्रीय खेळाडू करण साळुंखे, व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
लोक न्यूज