लोक न्यूज
अमयनेर : अहिरानी भाषा नि संस्कृतीना जागर करासाठे अहिरानी साहित्य परिषद धुये नि धनदायी एज्युकेशन सोसायटी यासनाकडतून पाचवं अहिरानी साहित्य संमेलन साथी गुलाबराव पाटील साहित्य नगरीमा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह मा तीस नी एकतीस मार्च ले हुई रायनं. यानामा गाना ,भजन ,पवाडा ,कविता , ओव्यासना जागर व्हवाव शे. संमेलन ना अध्यक्ष अहिरानी भाषा ना अभ्यासक डाक्टर रमेश सूर्यवंशी ,स्वागताध्यक्ष धनदायी माता एज्युकेशन संस्था ना अध्यक्ष डी डी पाटील , महाराष्ट्र राज्याना विश्वकोश निर्मिती मंडय ना सचिव डाक्टर श्यामकांत देवरे यासना हजेरीमा संमेलन हुई रायनं.
     आयतवार ३० मार्च ले गुढीपाडवा ना दिन दुपारले साडे तीन वाजाले ग्रंथ नि अहिरानी संस्कृतीनी दिंडी निंघाव शे. दिंडीमा कानबाई , तगतराव, इठोबानी वारी नं दर्शन हुई. ५ वाजाले संमेलन नं  उदघाटन मंगय ग्रह सेवा संस्थान ना अध्यक्ष डाक्टर डिगंबर महाले कराव शे. या वखतले जयगाव जिल्हा ना पालकमंत्री गुलाबराव पाटील , अमयनेरना आमदार अनिल पाटील , चाईसगाव ना आमदार मंगेश पाटील , धुयाना आमदार अनुप अग्रवाल , राजेश पाटील , आयुष प्रसाद , अर्चना राजपूत , बाळासाहेब भदाणे ,सभापती अशोज पाटील , मनोज पाटील , निलेश पाटील, हेमकांत पाटील, नामदेव पाटील,निलेश पाटील , पै पावना हजर रावाव शेत. त्याना नंतर अहिरानी भाषा साठे साहित्य अकादमी पुरस्कार भेटेल कृष्णा पाटील , यासले अहिरानी साहित्य भूषण , आणि जीवन गौरव पुरस्कार संजय गायन , धुयान्या सुमनताई देसले यासले देवाव शेत.
  संध्याकायले सव्वा सवं वाजाले  निकिता पाटील ना कार्यक्रम हुई. पुस्तकेसनं प्रकाशन  करावं शेत. साडे सव ते रातले  आठ वाजालगून निवतं देल कविसनं कविसमेलन हुई. रातले ८ ते १० वाजालगून खान्देशी सांस्कृतिक कार्यक्रम त्यानामा लोककवी प्रशांत मोरे ना कविता , हर्षल पाटील नं नाट्य  अभिवाचन , विलासकुमार शिरसाठ मुंबई  , प्रा पारसमल जैन शिरपूर यासनी अहिरानी मिमिक्री विजय पवार नंदुरबार यासना अहिरानी एकपात्री नाटक तसंच जातावरन्या ओव्या , खान्देशी गाना व्हतीन.
   सोमवारे ३१ ले सकायले कविताना कट्टा, साडे दहा ले ईचारधन परिसंवाद अहिरानी भाषा - संस्कृती ईचार ,पावने बाराले कथाकथन ,दुफारले १ वाजाले  सुदाम महाजन यासना अहिरानी ना झटका सव्वा वाजाले निवतं देल कविसनं संमेलन हुई. सव्वा दोन वाजाले प्रवीण माळी यासनं आयतं पोयतं सख्यानं हाऊ एकपात्री प्रयोग हुई , दुफारले  तीन वाजाले अहिरानी गौरव पुरस्कार देवावतीन. साडे तीन वाजाले संमेलन ना शेवट हुई. या कार्यक्रमना अध्यक्ष धुयाना माजी आमदार कुणाल बाबा पाटील रातीन. माजी आमदार डॉ सुधीर तांबे, माजी आमदार शरद पाटील , माजी आमदार डॉ बी एस पाटील पै पावना रातीन. हाई संमेलन व्हवासाठे अहिरानी साहित्य परिषद ना अध्यक्ष भगवान पाटील , उपाध्यक्ष  प्रा डॉ फुला बागुल , सचिव प्रभाकर शेळके , प्रकाश महाले, संयोजक डी डी पाटील ,प्रा अशोक पवार , प्रा डॉ लीलाधर पाटील , रणजित शिंदे राबी रायनात.