अमळनेर - राज्य उत्पादन शुल्क विभागा तर्फे आगामी विधान सभा निवडणूक
अनुषगाने अमळनेर तालुक्यात गेल्या २५ दिवसात २४ ठिकाणी धाडी टाकून ३ लाख ११ हजार २० रुपयांची ७ हजार ८६९ लिटर दारू जप्त केली आहे. तसेच हातभट्ट्या उध्वस्त केल्या आहेत.
अमळनेर तालुक्यात जळगाव जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी डॉ व्ही टी भूटन यांचा मार्गदर्शनाने नांदेड, टाकरखेडा, गांधली, अंमळगाव, मांडळ या ठिकाणी छापे टाकून गावठी दारू तसेच देशी विदेशी दारू अवैध रित्या विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात आली आहे. यासाठी चोपडा निरीक्षक कय्युम मोमीन,दुय्यम निरीक्षक अमळनेर जी.एस. मोरे कर्मचारी शशिकांत पाटील, दिनेश पाटील,विपुल राजपूत, भूषण परदेशी, संतोष निकम, सागर देशमुख यांनी कार्यवाही केली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ ची आचारसंहिता लागु झाले पासून दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ ते ८ नोव्हेंबर २०२४ यां कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जळगाव जिल्ह्यात अवैध दारु धंद्यांवर धडक कारवाई राबवून एकूण २६७ गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्यांमध्ये ६८लाख ९६ हजार २०० इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्यात देशी दारु ३६३ लिटर, विदेशी दारु ६० लिटर, हातभट्टी दारु ४९९२ लिटर, ताडी १२१ लिटर, हातभट्टी रसायन १ लाख ५१ हजार ७१८ लिटर, दुचाकी वाहने १० असा मुद्देमालांमध्ये समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात २४ , रावेर ११,भुसावळ २०,जळगाव शहर २५, जळगाव ग्रामीण ४६, अमळनेर २४, एरोंडल १३, चाळीसगाव १७, पाचोरा २२,जामनेर १५, मुक्ताईनगर २४ आशा वेगवेगळ्या ठिकाणी अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर एकूण २६७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.