गेल्या दोन तीन दिवसांपासून मंत्री अनिल दादा आणि शिरीष दादा यांच्यात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गुन्हेगारी या विषयावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शुभम देशमुख उर्फ दाऊद हा कारागृहात आहे मात्र त्याच्या फोटोवर चर्चा जोरात आहे.
मंत्री अनिल पाटील यांचे बॅनर शुभम देशमुख याने लावले होते. त्याची संधी साधत शिरीषदादा गटाने अनिल दादा बाबत गुंडगिरीचे आरोप केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून अनिलदादा च्या गटाने शुभम सोबत शिरीषदादाचा सेल्फी फोटो दाखवून गुंडगिरीचा आरोप केला.
भले शुभम देशमुख गुन्हेगार असेल तरी तोही माणूस आहे, त्याने लोकप्रतिनिधींना भेटू नये का ? त्याच्यावर अन्याय झाल्याचे त्याला वाटत असेल तर त्याने न्यायासाठी कोणाकडे जाऊ नये का ? त्याच्या समस्या कोणाला सांगू नये का? आणि अनिल दादा असो की शिरिषदादा यांच्यावर गुन्हे दाखल नव्हते का ? एकेकाळी खोटा एमपीडीए दाखल झालेला नगरसेवक श्याम पाटील साहेबराव दादा ,अनिल दादा ,शिरीष दादा अशा तिन्ही दादांच्या सोबत राहिला आहे. अनेक जखमी गुन्हेगार डॉ अनिल शिंदे यांच्याकडे उपचारासाठी आले आहेत. उद्या असेही आरोप होतील की डॉ शिंदेंनी गुन्हेगारांना वाचवले . माणुसकी नात्याने व व्यवसायाशी प्रामाणिक राहणारे डॉक्टर अनिल शिंदे गुन्हेगार ठरणार नाहीत त्यामुळे एकमेकांवर गलिच्छ आरोप होऊ नयेत असेच अनेकांना वाटत आहे.
राजकीय नेत्यांसोबत राहणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल नाहीत का? की कार्यकर्ता आपल्या कडे आला की स्वच्छ आणि समोरच्याकडे गेला की गुन्हेगार होतो का? राजकारणात आणि समाजात सभ्यतेचे बुरखे पांघरलेले अनेक गुन्हेगार नेत्यांच्या अवतीभोवती वावरत आहेत. ठेकेदार असो की गुटखा ,दारू ,सट्टा ,मटका ,जुगार , वाळूचोर , संस्थेत लूट करणारे ,विविध संस्थांमध्ये अपहार करणारे गुन्हेगार नव्हे का? त्यामुळे राजकीय नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा मी कामात आणि वागण्यात दुसऱ्यापेक्षा किती सरस आहे यांच्यासाठी आटापिटा चालवला तर अधिक योग्य राहील.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निवडून आल्यानन्तर ज्या सरकारमध्ये नेते जातात तेथेही अनेक नेत्यांवर आरोप आहेत. त्यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत. मग कशाला उगीच स्थानिक कार्यकर्त्यांना ,मतदारांना उपसवले जाते. राजकारण पत्त्यांचा डाव आहे इकडचा राजा ,एक्का ,गुलाम ,जोकर तिकडे जाणार आहेत तिकडून येणार आहेत एकाने सोडल्यावर दुसरा घेईल किंवा सोडून देईल मात्र त्यांच्याच जीवावर बाजी जिंकणार आहेत. प्रेमात ,युद्धात आणि राजकारणात साम ,दाम ,दंड भेद सर्वच लागू राहते मात्र संतांची , दानशुरांची, साहित्यिकांची , क्रांतिकारकांची भूमी अस्वस्थ होणार नाही याची काळजी दोन्ही दादांनी घ्यावी हीच माफक अपेक्षा !