देशाचे अर्थराज्यमंत्री ना,डॉ,भागवत कराड,भाषण करतांना, शेजारी धोंडीरामसिंह राजपूत,व मोहसीन शहा,गुंजाळ..


वैजापूर-लोक न्यूज
नौकरी मिळविण्यात  वयाची महत्वपूर्ण वर्षे घालविण्यापेक्षा देशातील उच्च विद्याविभूषित तरुणांनी स्वतःचा उद्योग उभारून स्वावलंबी बनावे व सक्षम राष्ट्र उभारणीला हातभार लावावा व सामाजिक बंधीलकी ही जपावी असे आवाहन देशातील युवकांना
भारत सरकारचे अर्थ राज्य मंत्री ना,डॉ,भागवत कराड यांनी येथील रॉयल असोसिएटस टॅक्स कन्सलटंट फर्म चे उदघाटन करतांना रविवार(ता,०५)रोजी केले,या प्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा चे माजी अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे  होते, त्यांनी शिक्षणावर भर देत विशद केले की,शिक्षणातून देशातील गरिबी दूर होईल सर्व पालकानी आपल्या पाल्याना उच्च शिक्षण द्यावे असे आवाहन केले,प्रास्ताविक व सूत्र संचलन धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले आभार मोहसीन शहा यांनी मानले या,प्रसंगी अल्पसंख्याक भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष नबी पटेल यांनी शहरातील राष्ट्रीय बँक अधिकारी वर्गाच्या असहकार्य बद्धल भाषणातून तक्रार केली,डॉ,कराड यांनी त्यांची बैठक घेऊन समज देण्यात येईल असे आश्वासन दिले,या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष कल्याण दांगोडे,भाजपा युवा मोर्चा चे तालुका अध्यक्ष अनिल वाणी,प्रभाकर गुंजाळ,, निकिता काळे,गोकुळ भुजबळ,प्रकाश भोपळे,हाजी लुकमान शहा,संदीप टेके,ऍड मझर बेग,शमीम सौदागर,यांच्या सह शहरातील  नागरिक उपस्थित होते, मोहसीन शहा,आणि मोइन शहा यांनी सर्वांचे स्वागत केले,व आभार मानले.