ना.डॉ.भागवत जी कराड संबोधित करतांना व्यासपीठावर मा,आ,हरिभाऊ बागडे,आ,बोरणारे,मोहन आहेर, बाळासाहेब संचेती..
वैजापूर- लोक न्यूज
वैजापूर हे शहर मराठवाड्याचे प्रवेश द्वार आहे, या शहराचे प्रलंबित प्रश्न औद्योगिक वसाहत, विनायक साखर कारखाना, रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना,व रस्ते विकास या कडे जातीने लक्ष देऊन हे प्रश्न येत्या काही दिवसात मार्गी लावणार असल्याचे ठोस आश्वासन केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ,भागवत जी कराड यांनी रविवार(ता,०५)रोजी येथील एका कार्यक्रमात उपस्थित जनसामुदायाला दिले,धोंडीराम राजपूत यांनी वरील प्रलंबित प्रश्न तसेच काही रेल्वे रोटेगावला थांबव्या म्हणून उपस्थित केले होते ,यावर मंत्री महोदय यांनी वरील आश्वासन दिले,समृद्धी महामार्गाने जाणारा गॅस ही वैजापूरला मिळवून देणार असेही ते बोलले,वैजापूर ग्रामीण भागातील रस्ते या साठी विशेष निधी केंद्र सरकार कडुन मिळऊन देणार
विकास बाबत वैजापूर-गंगापूर या दोन्ही तालुक्याकडे लक्ष पुरविणार असे ही डॉ,कराड यांनी सांगितले,अध्यक्ष स्थानी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे होते, त्यांनी कौशल्य पूर्ण शिक्षण वर भर देत मुलां-मुलींना बौद्धिक शिक्षणाची गरज त्यांनी व्यक्त केली, या प्रसंगी आ,रमेश, पा, बोरनारे,
बाळासाहेब संचेती,देवगिरी बँक चेअरमन किशोर शितोळे,सभापती राधकीसन पठाडे यांचे समयोचित भाषणे झाली,मोहन आहेर,एन,डी,डिघुळे, मनोज चोपडा ,प्रभाकर गुंजाळ, भास्कर आहेर, पल्लवी आकाश आहेर,यांनी सहभाग नोंदविला, सूत्र संचलन व आभार ठा,धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले,मोहन आहेर,ऐन, डी,डिघुळे यांनी परिश्रम घेतले,साळुंकेसुनील ,काझी सर,श्री ,सूर्यवंशी, व श्री त्रिभुवन यांनी सहकार्य केले.

