लोक न्यूज
अमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री. दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांचा *दीक्षांत समारंभ* साजरा करण्यात आला तसेच *रंगोत्सव या आंतरराष्ट्रीय कला स्पर्धेचे बक्षिस वितरण* ही करण्यात आले.
या दोन्ही कार्यक्रमांना प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री वासुदेव देसले, उपविभागीय पोलिस अधिकारी, त्रंबकेश्वर पेठ उपविभाग नाशिक ग्रामीण, मा.सौ. मंदाकिनी भामरे,तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस,सरपंच लोन तसेच संस्थेचे चेअरमन मा. श्री उत्कर्ष पवार यांची उपस्थिती लाभली होती. विशेष अतिथींच्या उपस्थितीने शाळेची व कार्यक्रमाची शोभा वाढवली.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीवंदना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रथम सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ पार पडला यावेळी या लहान चिमुकल्यांना पदवी देण्यात आली.सर्व विद्यार्थी पदवी स्वीकारण्यासाठी निळ्या रंगाचा कोट व टोपी प्रधान परीधान करून आले होते. ग्रॅज्युएशन सोहळ्याची सुरुवात लहान चिमुकल्यांनी स्टेजवर चालताना केली. उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.सिनियर केजीच्या शिक्षिका संगीता पाटील यांनी विद्यार्थ्यांविषयी आपले प्रेम, शिकवण इ.विषयी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात यानंतर रंगोत्सव या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेच्या बक्षीस वितरणास सुरुवात झाली. या स्पर्धेत शाळेने व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संपादनूक व पुरस्कार प्राप्त केले आहे. शाळेत दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी रंगोत्सव ही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलास्पर्धा आयोजित केली जाते. यावर्षी 150 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता त्यात सर्वच विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्राविण्य व बक्षीस प्राप्त झाली. विशेष म्हणजे त्यातील 30 विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. यातही सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्राविण्य मिळविले. विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मेडल्स, ट्रॉफीज,अवार्ड्स आणि नाविन्यपूर्ण भेटवस्तू प्राप्त झाल्या आहेत. महत्वपूर्ण बाब म्हणजे शाळेला *"World Education Prestige Award 2025-26"* ने सन्मानित करण्यात आले आहे. ही शाळेसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.तसेच विद्यार्थ्यांनाThe Exemplary Raja Ravi Verma Award
The Art Maestro Award,The Amrita Shergill Award,Dr.M.F Hussain Award
इ. अनेक बक्षिसे प्राप्त झाली आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशस्वी कामगिरीमुळे शाळेचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंदविले गेले आहे.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल प्रमुख पाहुण्यांकडून भरभरून कौतुक करण्यात आले.प्रमुख पाहुणे मा. श्री. वासुदेव देसले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व लहान पदवीधरांना तसेच सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन दिले. शिक्षण आणि इतर सह- अभ्यासक्रम उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचे समर्पण व कठोर परिश्रमाबद्दल शिक्षकांचे देखील कौतुक व अभिनंदन केले.
संस्थेच्या सचिव सौ. अलका पवार,उपाध्यक्ष मा.श्री उमाकांत पाटील व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वर्षा सोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मनीषा सोनार व नीतू शेलकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षिका योगिता फालके,कविता पाटील,प्रतीक्षा पाटील,चारुलता तायडे,संगीता पाटील, मनीषा ठाकूर, जयश्री प्रदेशी, प्रियंका महाले, रोशनी महाजन तसेच शिक्षकेतर कर्मचारी भाग्यश्री पाटील यांचे अमूल्य व विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचा समारोप संस्थेच्या सचिव अलका पवार यांनी आभार व्यक्त करून केला.
हा कार्यक्रम केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर पालकांसाठी देखील एक आनंदाचा व संस्मरणीय दिवस होता.