लोक न्यूज
आज दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी ग्रामीण रुग्णालय झोडगे यांच्या वतीने जनता विद्यालय झोडगे येथे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी HPV (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरणाबाबत सविस्तर मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थिनींना HPV विषाणू काय आहे, त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम, विशेषतः गर्भाशय मुखाच्या कर्करोगाशी त्याचा असलेला संबंध, तसेच या आजारापासून बचाव करण्यासाठी HPV लसीकरण किती आवश्यक आहे याबाबत सखोल माहिती देण्यात आली. लसीकरणाबाबत समाजात प्रचलित असलेले समज व गैरसमज यांचे निरसन करण्यात आले आणि विद्यार्थिनींच्या मनातील शंकांचे समाधानही करण्यात आले.
सदर कार्यक्रम मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीष शिंपी सर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी सर, डॉ. बाळू पाटील सर, डॉ. आनंत पवार सर तसेच ग्रामीण रुग्णालय झोडगे येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद खैरनार सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या कार्यक्रमासाठी ग्रामीण रुग्णालय झोडगे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बोरुडे सर, RKSK समुपदेशक श्री. नारायणसिंग गिरासे आणि NCD समुपदेशक श्री. जगदीश शिंदे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्यांनी HPV लसीकरणाचे महत्त्व, योग्य वय, डोस, सुरक्षितता आणि त्याचे दीर्घकालीन फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमास PHC कर्मचारी, उपकेंद्र झोडगे येथील ANM, पर्यवेक्षिका तसेच आशा सेविका यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यास मदत झाली.
तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दीपक देशमुख सर, उपप्राचार्य श्री. एस. व्ही. देसाई सर, बाविस्कर सर आणि इतर शिक्षकवर्ग यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.
एकूणच, हा कार्यक्रम विद्यार्थिनींमध्ये आरोग्य जागरूकता वाढविणारा, HPV लसीकरणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा आणि भविष्यातील गंभीर आजारांपासून संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरला.