अमळनेर येथील सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूल तांबेपूरा, अमळनेर येथे दिनांक ३/१/२०२३ रोजी सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनाचे औचित्य साधून फॅन्सी ड्रेसचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आमदार सौ.स्मिता ताई पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुभेदार श्री. नागराज पाटील, सुभेदार श्री. श्रीराम पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन कार्यक्रम राबविण्यात आला शाळेचे चेअरमन श्री. महेश पाटील सर शाळेच्या प्राचार्य सौ. नूतन महेश पाटील तसेच सर्व शिक्षिका व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले सौ.भारती पाटील यांनी सूत्रसंचालन केले व सौ.सिमा बडगुजर यांनी आभार प्रदर्शन केले.


