लोक न्यूज
लोकशाही शासन प्रणालीचा चौथा आधारस्तंभ म्हणून वृत्तपत्र कडे पाहिले जाते, आज देशात जिवंत असलेली लोकशाही याचे श्रेय वृत्तपत्रालाच जाते,आज
सोशल मीडिया आहे,विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमे आहेत परंतु आजही वृत्तपत्रचेजे महत्व काल होते ते आजही आहे,मी तर असे म्हणेल की ,वृत्तपत्राचे महत्व उद्याही असेच राहणार, खूप वर्तमान पत्र प्रकाशित होत आहेत तेव्हढी विकल्या जात आहेत, आजही वाचकांची विश्वासाहर्ता टिकून ठेवण्यात वर्तमानपत्र यशस्वी झालेली आहेत,समाजपरिवर्तन चे महत्वचे
माध्यम म्हणजे वर्तमान पत्रच होय,
अशा या लोकशाही च्या चौथ्या आधार स्तंभ चा पाया रचला गेला६जानेवारी,१८३२ साली,हा पाया रचणारे पत्रकारिताचे दीपस्तंभ होते,बालकृष्ण शास्त्री जांभेकर,६जानेवारी,१८३२साली त्यांनी मराठी भाषेतील पाहिले वृत्तपत्र काढून या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधन कार्य आरंभ केले, बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे अग्रदूत संबोधतात, या मराठी भाषेतील पहिल्या वृत्तपत्रामुळे त्यांना लोकमान्यता व राजमान्यता प्राप्त झाली,त्यांना हे वृत्तपत्र चालवीत असताना खूप अडचणी व समस्यांशी सामना त्यांना करावा लागला मात्र याशी सामना करीत त्यांनी हे वृत्तपत्र अखंडपणे आठ वर्षे चालविले, त्याना अत्यंत अल्प आयुष्य लाभले, त्यांचे वयांच्या ३५व्या वर्षी निधन झाले,तो दुर्दैबी दिवस होता ६ जानेवारी,आणि म्हणून त्यांचा स्मृती दिन दर्पण दिन म्हणून दरवर्षी
त्यांच्या स्मृतींना अभिवादन दिन म्हणून पाळल्या जातो,त्यांनी आपल्या ह्या वृत्तपत्रतून समाज प्रबोधन व लोकशिक्षण आरंभ केले,त्यांच्या या वृत्तपत्रीय क्षेत्रातील महान कार्यामुळे समाजप्रबोधन सोबत समाजाची  छबी ,समाजाचे चित्र वर्तमान पत्रात दिसू लागले,समाजाती घडामोडी समाजातील
तळा-गाळतील  घटकापर्यंत पोहचू लागल्या,समाजातील प्रश्न,समस्या ,यांची चर्चा होऊ लागली,वर्तमानपत्र तत्कालीन प्रशासन कर्त्यांची व त्यांच्या कार्य पध्दतीची चर्चा होऊ लागली,लोककल्याणकारी उपक्रमाची माहिती येऊ लागली,त्याचप्रमाणे अन्याय, अत्याचाराच्या घटना वृत्तपत्रात येऊ लागल्या,लोकसंघटन,लोकचळवळ उभारणे, लोकशिक्षण, व लोकप्रबोधन अशा किती तरी
विधायक व रचनात्मक कार्याची नोंद या वर्तमान पत्रात व्हायला लागली,याच काळात लोकहितवादी म्हणून ओळखले जाणारे गोपाळ हरी देशमुख,यांनीही
१८४८ते१८५० या दोन वर्षात सामाजिक,सांस्कृतिक, आर्थिक विषयावर १०८पत्रे "प्रभाकर"या वृत्तपत्रात प्रसिद्ध केली,ही पत्रे शातपत्रे म्हणून खूप गाजली, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनीही १८८१या वर्षी "केसरी"नावाचे दैनिक वृत्तपत्र सुरू केले जे आजही चालू आहे,१८९६साली देशात मोठा भयानक दुष्काळ होता,या समयी ब्रिटिश सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगरकरांनी खूप जळजळीत लेख लिहिला होता, मुंबई मध्ये नवाकाळ हे दैनिक १९२३ पासून कृष्णाजी
प्रभाकर खाडीलकर यांनी आरंभ केले,आचार्य।प्रल्हाद केशव अत्रे यांनी १९४०साली नवयुग साप्ताहिक व नंतर तुकाराम साप्ताहिक व जय हिंद सायं, दैनिक व नंतर१९५६साली दै,मराठा  नावाचे वृत्तपत्र सुरू केले,
या सर्वांनी अत्यंत प्रामाणिक व निःपक्षपाती पणे पत्रकारिता केली, आज मोठया प्रमाणत मोठी व छोटी वृत्तपत्रे ,साप्ताहिके,मासिके ,पक्षिके आपापल्या परीने  समाज प्रबोधन ,जनकल्याणकारी योजना,सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक, क्रीडा,कृषी क्षेत्र माहिती वाचकपर्यंत पोहचवीत आहेत, बाळ शास्त्री जांभेकर यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्षेत्रातील वृत्ताला ही प्राधान्य दिले,त्यांची पत्रकारिता कोण्या एका क्षेत्रापूर्ती मर्यादित नव्हती, आकसपणांची, दुजाभावा
तर त्यांची अजिबात नव्हती, आज त्यांच्या पत्रिकारितेला पुढे चालवायला हवे, पत्रकार निःपक्षपाती, निर्भीड ,स्पष्ट असावा अशी अपेक्षा आहे हेच खरे अभिवादन बाळ शास्त्री जांभेकर याना ठरेल.
धोंडीरामसिंह ,ध ,राजपूत,न्यू सन्मित्र कॉलोनी,लाडगाव रोड,वैजापूर, जि,औरंगाबाद