वैजापूर-लोक न्यूज
येथील वैजीनाथ जेष्ठ सेवा संघाच्या वतीने जेष्ठ नागरिकांना शाल ,गुलाब पुष्प,व तीळचे लाडू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला,व या निमित्ताने सेवा
निवृत्त प्राध्यापक पी, एम,शिंदे यांचे गीतेवर व्याख्यान ही झाले,या समयी त्यांनी गीतेचे आजच्या व्यक्ती जीवनातील महत्व विशद केले,जेष्ठ नागरिक झुंबरलाल शर्मा,भगवानदास भाटिया,कचरू गुडघे, गोपालदास आसर यांनी  तिळगुळ प्रदान केला,अध्यक्ष स्थानी संघाचे प्रकाश शेठ बोथरा होते, मंचवर रविंद्र आप्पा साखरे,यांची उपस्थिती होती, संघाचे सचिव धोंडीरामसिंह राजपूत यांनी सूत्र संचलन केले, आभार सह सचिव संपत डोंगरे यांनी मानले,उत्तमराव साळुंके यांनी साने गुरुजी प्रार्थना व पसायदान गायिले या प्रसंगी कोषाध्यक्ष सुरेश संत,संचालक बबनराव क्षीरसागर ,सुदाम आप्पा गोंधळे, यांनी सहभाग नोंदविला,या समयी,गंगारामसिंह राजपूत,अशोक धसे
नारायण लाडवानी,बाबासाहेब गायकवाड, रामेश्वर गायकवाड, भगवानसिंह राजपूत, मुकुंद दाभाडे,अशोक जोशी ,रामदास रत्नपारखी,रामदास  बोरसे यांची उपस्थिती होते.