वैजापूर-लोक न्यूज
शहराचे आराद्य दैवत असलेल्या श्री वीरभद्र यात्रेत रोहिदास भगत यांनी पूर्वापार चालत आलेली बारा गाड्या ओढण्याची परंपरा रविवार(ता,२९) रोजी बारा गाड्या ओढून राखली त्यांनी कमरेला हुक लावला दोर उभ्या एकाला एक अशा बांधलेल्या १२बैल गाड्याना श्री स्वामी समर्थ मंदिर ते वीरभद्र मंदिर पर्यंत बारा गाड्या ओढत नेल्या त्यांना सहकार्य करण्यात आले, या प्रसंगी जेष्ठ पत्रकार घनश्याम वाणी,धोंडीरामसिंह राजपूत, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र पा, साळुंके,बाबुराव गावडे,रामकीसन जोरे,बापू गावडे,ललित गावडे,प्रणव गावडे,गणेश डुकरे,पप्पू लांडे,सुरेश घाटे, कैलास वाघ,गोरख गावडे,अक्षय मोटे,
बाबुराव गावडे यानी प्रतिष्ठित नागरिकांचा श्रीफळ देऊन सत्कार केला, सकाळी पालखी व छडी मिरवणूक काढण्यात आली,या निमित्ताने शोभेची दारू सोडण्यात आली रात्री आठ वाजता पारंपरिक ओव्या, व फड सुद्धा आयोजित केला होता, बाबुराव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरख गावडे यांनी नियोजन केले,ललित गावडे यांनी आभार मानले.

