लोक न्यूज-
अमळनेर : जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत सर्व संघटनांचे उमेदवार तुषार नारायण बोरसे यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगीच शेकडो मतदारांनी स्वेच्छेने उत्स्फूर्तपणे हजेरी लावून पाठिंबा दिल्याने सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. 
तुषार बोरसे यांचा मनमिळाऊ स्वभाव , सर्वांच्या मदतीला धावून जाणे , कर्मचाऱ्यांची कामे करणे , कर्मचाऱ्यात लावालावी न करणे , कर्मचाऱ्यांचा द्वेष न करणे , समानतेची वागणूक देणे , कोणाचीही दलाली न करणे , फुकटात कर्मचाऱ्यांची कामे करणे ,दांडगा जनसंपर्क यामुळे तुषार बोरसे मतदारांच्या मनात बसले आहेत. त्यांना मुख्याध्यापक  संघ , माध्यमिक शिक्षक संघ ,टीडीएफ संघटना ,शिक्षक भारती संघटना , शिक्षकेतर कर्मचारी संघटना , शिक्षक परिषद ,राष्ट्रवादी शिक्षक संघटना , शिक्षक सेना , ओबीसी शिक्षक संघटना ,कलाध्यापक संघटना , विज्ञान मंडळ , गणित मंडळ , आदी संघटना सदस्य , पदाधिकारी यासह इतर मतदारांनी हजेरी लावून पाठिंबा दिल्याने त्यांचे पारडे जड झाले आहे. चांगल्या  आणि मनापासून सोबत उभे राहणाऱ्या लोकांचा पाठिंबा तुषार बोरसे याना असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास अनेकांनी व्यक्त केला. शुभारंभ प्रसंगीच मतदारांनी प्रचंड गर्दी करून  विजयाची सलामी दिली असल्याची रवीवारी जोरदार  चर्चा होती
सर्वसामान्य मतदार हीच माझी ताकद आहे ,गेल्या चार वर्षांपासून मतदारांचा आग्रह , सहकार्य हीच माझी  शक्ती आहे. त्यामुळे त्यांच्या  जीवावरच मी मोठा झालो आहे आणि विजयी देखील होणार आहे असा आत्मविश्वास तुषार बोरसे यांनी यावेळी व्यक्त केला. विशेष म्हणजे महिला मतदार देखील याप्रसंगी हजर होत्या.


जाहिरात...