वैजापूर-लोक न्यूज
प्रजासत्ताक दिनाचे दिवशी येथील श्रीमद भागवत कथा कार्यक्रम संपल्यानंतर गुरुवार(ता,२६)रोजी देशाच्या तिन्ही दलांच्या स्थलदल, वायूदल, व नाविक दल, सैनिकांच्या व देशाच्या सन्मानार्थ ,व सनातन धर्म,संस्कृती सन्मानार्थ शहरातील पुरुष, महिला,तरुण,जेष्ठ नागरीक, व छोटी मुले यांची भव्य व दिमाखदार राष्ट्रधर्म  मिरवणूक  विविध वाद्य,भगवा ध्वज, तिरंगा ध्वज फडकवीत काढण्यात आली,या मिरवणुकीत स्वतः परमपूज्य शांतिदुत व धर्मरत्न श्री
देवकीनंदन ठाकुरजी महाराज सहभागी झाले होते,भारत माताकी जय,वंदे मातरम, प्रजासत्ताक दिनाचा विजय अशा घोषणा  देत युवक ,युवती व सर्व नागरिक अत्यंत शिस्तबद्धपणे या मिरवणूकित सहभागी झालेले होते, संपूर्ण जगताला राष्ट्रप्रेम,राष्ट्र निष्ठा व एकतेचा संदेश जावा व सनातन धर्म व संस्कृती जगातील आदर्श संस्कृती आहे हे कळावे तसेच भारतीय सैनिकांचे हीं मनोबल उंचवावे या साठी
प्रजासत्ताक दिनी ही धर्म व राष्ट्र निष्ठेची मिरवणूक जीवनगंगा या वसाहतीपासून संकट मोचन मंदिर पर्यंत काढण्यात आली, या मध्ये शहरातील पांच ते सात हजार स्त्री-पुरुष,तरुण ,छोटी मुले व मान्यवर सहभागी झाले होते, आयोजक राजू जोगीलाल राजपूत ,भावलाल सोमासे,गोकुळ राजपूत,योगेश राजपूत,यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेम राजपूत व संचलन कर्ते ठा, धोंडीरामसिंह राजपूत यांनी शिस्तबध्द नियोजन करून ही मिरवणूक काढली,मिरवणूक प्रमुख नगरसेवक गणेश खैरे, सोमु सोमवशी,दिनेश राजपूत ,करण राजपूत, मनोज राजपूत,राजू चहावाले, यांनी सहभाग नोंदविला, या राष्ट्रधर्म ,राष्ट्रनिष्ठ,सैनिक सन्मानार्थ निघालेल्या मिरवणुकीत डॉ,दिनेश परदेशी,नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी, प्रशांत कंगले, व शहरातील सर्व स्तरावरील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.