सोलापूर -लोक न्यूज
महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासमवेत शिक्षिका म्हणून काम केलेल्या प्रथम मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांच्या नावे आयोजित करण्यात आलेले साहित्य संमेलन उत्साहात पार पडले.

शिक्षिका फातिमा शेख शिक्षिकेच्या स्मरणार्थ पुणे येथे टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात पहिले राज्यस्तरीय आद्यशिक्षिका फातिमा शेख संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे आयोजन इन्तिखाब फराश व ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था,पुणे जिल्हा शाखेने केले होते. संमेलनादरम्यान प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेच्या मुखपृष्ठावर फातिमा शेख व शारदाताई शिंदे यांना स्थान देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला होता.

सोलापुरातील शारदा अंबादास शिंदे या शिक्षिका होत्या. त्यांनी शिक्षणाच्या चौकटीबरोबर सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातही अखेरपर्यंत कार्य केले. त्यांचे गतवर्षी निधन झाले. त्यांच्या कार्याला कायम उजाळा देण्याचा प्रयत्न म्हणून मातोश्री शारदा अंबादास शिंदे मेमोरियल ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती अंबादास शिंदे,भाऊसाहेब कांबळे यांनी दिली.