वैजापूर-लोक न्यूज
शुक्रवार(दि.२०)पासून श्री देवकीनंदन ठाकूर महाराज यांच्या अमृत वाणीतून श्रीमद भागवत कथा जीवनगंगा या वसाहतीत आरंभ होत आहे,या निमित्त शहरात आज महाराजांचे आगमन होताच त्यांची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली, ठक्कर बाजार जुने बस स्टॅण्ड येथून ही मिरवणूक काढण्यात
आली,डीजे,बँड, उंट,घोडे,व कळस धारी महिला भजनी मंडळ अशा लावाजाम्या ही शोभा यात्रा जीवन गंगा वसाहती जवळील कार्यक्रम स्थळी नेण्यात आली,महाराजांनी संकट मोचन हनुमान जींचे पूजन केले येथे त्यांनी श्री भागवत ग्रंथ अध्यक्ष राजूभाऊ जोगीलाल राजपूत व त्यांच्या कुटुंबियांच्या डोक्यावर ठेवला व तेथून शोभायात्रा कार्यक्रम स्थळा पर्यंत पायी आली या प्रसंगी नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी,डॉ,दिनेश परदेशी, उपनगराध्यक्ष साबेर
खान ,समितीचे कार्याध्यक्ष भावलाल काका सोमासे, अशोक पवार,प्रेम राजपूत,ज्ञानेश्वर टेके, प्रशांत सदाफळ,कैलास साखरे,योगेश राजपूत,राजू लालसरे
धोंडीरामसिंह राजपूत,शोभा यात्रा आयोजक नगरसेवक गणेश खैरे,पारस घाटे, महिला ग्रुप च्या मनीषा डोभाळ,शीतल राजपूत,वर्षा राजपूत,पूजा छानवाल,प्रतिभा तांबे,राधा चुंगडे,दीप्ती चित्ते,वर्षा राजपूत,मानसी खैरनार, जयमाला वाघ,अंजली जोशी,जयमाला वाघ संतोषी भालेराव यांनी महिलांनी सहभाग नोंदविला, रस्त्याच्या दुतर्फा पुरुष महिलांनी मोठी गर्दी केली होती,वैजापूर करांनी महाराजांचे उस्फुर्त स्वागत केले,सायंकाळी चार वाजता श्रीमद भागवत आरंभ झाले,पोलीस निरीक्षक साम्राटसिंह राजपूत यांनी या समयी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला
होता.


