लोक न्यूज-
अमळनेर तालुक्यातील मुडी प्र डा येथे  गुरांच्या पान्याच्या पिण्यासाठी असलेल्या ठिकाणी आजूबाजूला अतिशय घाणीचे साम्राज्य व हौद मध्ये पूर्ण हिरवेगार शेवाळ झाले आहे. गावाकऱ्यांकडून वारंवार ग्रा प ला सांगण्यात येत आहे की हौद स्वच्छ धुवा शेवाळ काढा तरीही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे. या बाबत सर्वत्र परिसरात दुर्गंधी पसरत आहे आरोग्यचा प्रश्न उद्भवतो सध्याची परिस्थिती पाहता गुरांवर लंपी सारखा महाभयंकर आजार त्यातच पिण्याचे पाणी खराब आजूबाजूला असलेली घाण ही परिसरात राहणाऱ्या लोकांना व गुरांना रोगकारक ठरवू शकते या बाबत ग्रामपंचायत लक्ष देण्याची गरज आहे. बस स्टॅण्ड जवळ व ग्रामपंचायत समोरील गुरांचा पीण्याचा पाण्याचा हौद  हा अतिशय खराब झाल्याने त्यात येणारे स्वच्छ पाणी हे गडूळ होत असते त्याला हौद हा वेळो वेळी स्वच्छ केला जात नसल्याने त्याची दुर्गंधी येते तेथे गुरे पाणी पीत नाही तसेच काही तहानलेली गुरे ही नाईलाजाने पाणी पीत असल्याकारणाने त्याना वेगवेळ्या आजराला देखील समोर जावे लागते या बाबत देखील नागरिकांची ओरड येत आहे तो परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा व हौद देखील वेळी वेळी धुऊन भरावा असे नागरिकांन कडून बोलले जात आहे.