लोक न्यूज-
 या वर्ष्यापासून वेगळ्या पद्धतीने 
छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करू राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत राष्ट्रीय महापुरुषांवर भाषण करणारे वक्ते तयार करून,त्यांच्या विचारांचा प्रचार करण्याचे अभियान सुरू केले आहे.
दिनांक ७ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२३ या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन दर्शन व कर्तुत्वावर आधारित किमान ५० व्याख्यानांचे आयोजन अमळनेर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात करावयाचे आहे .वय वर्षे १४ वरील ज्या विद्यार्थी,युवा व नागरिकांना ,छत्रपती शिवाजी महाराज यांचे वर व्याख्यान द्यायचे आहे त्यांची नाव नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.
या अभियानात सामील होण्यासाठी खालील बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष द्या....

■  या अभियानात सामील होण्यास कोणतीही नोंदणी फी नाही 
■ नाव नोंदणी ४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत करावी. 

नोंदणी केलेल्या व्याख्यात्यांना

●  व्याख्याना संबंधी मार्गदर्शन करून तयारी करून घेतली जाईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन,त्यांची कार्यशैली व कर्तृत्वावर आधारित वाचन साहित्य देण्यात येईल. 
 ● व्याख्यानाचे आयोजन शहरात,शाळेत, कॉलेजमध्ये किंवा ग्रामीण भागात केले जाईल.व्याख्यात्यांना मानधन मिळणार नसले तरी व्याख्यात्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 
● प्रोत्साहनपर उत्कृष्ट ५ वक्त्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील.

    ●    ज्या गावात किंवा वार्डात छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान आयोजित करावयाचे असेल त्यांनीही संपर्क साधावा त्यांना वक्ते देण्याची व्यवस्था करता येईल.
★ वक्ते यांची नाव नोंदणी प्रा.अशोक पवार - 9422278256 या व्हाट्सअप नंबर वर करावयाची आहे. 
तसेच

◆ अध्यक्ष, युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर या नावाने पत्र द्यायचे असून, त्या पत्रात व्याख्यात्याने आपले शिक्षण,जन्मतारीख ,व्यवसाय,अनुभव असल्यास त्याचीही माहिती द्यावयाची आहे. त्याचबरोबर आपला संपर्क नंबर व पत्ता नमूद करणे आवश्यक आहे.

वक्तृत्व/भाषण कला/महापुरुषांचे विचार/सामाजिक ऋणाची परतफेड 

यात रुची असणाऱ्या व्याख्यात्यांना अग्रक्रम आहे.


संचालक/समन्वयक/सर्व अभियान प्रेमी

युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर