लोक न्यूज-
अमळनेर येथील ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्था सचिव प्रा श्याम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले अध्यक्ष ॲड ललिता पाटील संचालक पराग पाटील प्रा देवश्री पाटील प्राचार्य विकास चौधरी प्राचार्य प्रकाश महाजन क्रीडा शिक्षक केदार देशमुख सर व इतर शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती 
     वर्षभरात विविध शैक्षणिक उपक्रम,स्पर्धा व क्रीडा महोत्सवात ज्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळविला व विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून यश संपादन केले त्यांचा मेडल व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला
    यावेळी अध्यक्ष ॲड ललिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले येते शैक्षणिक  वर्ष सन २०२३-२४ हे शाळेचे १० वे वर्ष आहे . त्यासाठी देखील संस्था अध्यक्ष ॲड ललिता पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्य विकास चौधरी यांनी प्रस्तावना करत संस्थेचा गेल्या वर्षभराचा आढावा मांडला व विद्यार्थ्यांना येत्या त्यांच्या दहावी व बारावी च्या बोर्ड परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या देशभक्तीपर गीत गायनाचा व नृत्याचा सुरेख असा कार्यक्रम केला सर्व पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व मान्यवर यांनी उत्साहीत होऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला मंगला चौधरी मॅडम यांनी आभार मानले व कार्यक्रमाचा समारोप केला.