लोक न्यूज-
दिनांक ०३/०१/२०२३ रोजी विजय नाना पाटील आर्मी स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, अमळनेर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दीन प्राचार्य श्री. पी.एम. कोळी सर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
           या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. गिरीश कापडे सर हे मंचावर उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
        तर प्रमुख वक्ते म्हणून श्रीमती एस. पी. अहिरे मॅडम व श्रीमती पी. सी. पाटील मॅडम*यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
         स्री शिक्षणात सावित्रीबाई फुले यांचे योगदान आणि त्यामुळे स्त्रियांना मिळालेली सामाजिक बळकटी व सन्मान याविषयी विद्यार्थ्यांना  माहिती करून दिली.
            या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सौ. प्राजक्ता शिंदे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शनाचा भार श्रीमती ललिता भोंडेकर मॅडम यांनी सांभाळला. या वेळी सर्व विद्यार्थी शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.