वैजापूर -लोक न्यूज
येथील गुरुद्वारा उत्सव समितीच्या वतीने गुरुवार(ता,०५)रोजी श्री, गुरू गोविंदसिंघ जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली,सकाळीच गुरुद्वारात आ,रमेश पा,बोरनारे यांनी गुरुद्वारात गुरू गोविंदसिंघ यांच्या प्रतिमेला अभिवादन केले ,समितीने गुरू गोविंदसिंह यांच्या प्रतिमेची शहराच्या विविध भागातून
प्रभात फेरी काढली ,भजने गाऊन आदरंजली अर्पण केली या समयी बलविंदरसिंग,सुमित पोथीवाल, नंदकुमार आहुजा,कपिल आहुजा, प्रीती कौर,दिलजीत खनिजो,जितो खनिजो,अमर आहुजा,दिनेश आहुजा, धोंडीरामसिंह राजपूत ,बाबा साहेब जगताप,प्रभात फेरीत सहभागी झाले होते, या निमित्ताने गुरुद्वारात पोथी वाचन,गुरू ग्यानसिग,यांनी केले,नगर कीर्तन,महा प्रसाद व लंगर चे पण आयोजन करण्यात आले होते,या समयी शीख,सिंधी, पंजाबी ,बंधू ,भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते, प्रीतिकौर व दिलजीत खनिजो परिवाराने यात पुढाकार घेतला, आ,बोरनारे, यांनी गुरुद्वार विकास साठी निधी देणार असल्याचे विशद केले.
