लोक न्यूज-
 माध्यमिक विद्यालय म्हसवे शाळेत ३ जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरिता देशमुख मॅडम यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेतील शिक्षक बंधू यांनी पुष्पगुच्छ देऊन शाळेतील महिला मुख्याध्यापिका यांचा सत्कार केला  
     आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी रीना पाटील, हर्षदा पाटील यांनी केले .इ.५वी ते १० वी  विद्यार्थ्यांनी भाषण केले आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी कविता, ओवी ,अभंग सादर केले . कार्यक्रमाचे अध्यक्षा श्रीमती देशमुख मॅडम यांनी सावित्रीबाईंच्या कार्याची माहिती . सांगितली तसेच शिक्षक प्रतिनिधी श्री. जे एस.पवार ,  श्री एस .एम. पाटील, श्री व्ही.आर .महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
     कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक जितेंद्र पवार, शरद पाटील, शोभा बेहेरे, ललिता सूर्यवंशी, वैशाली पाटील, विजय महाजन, गोरख पाटील, उमाकांत बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.